उल्हासनगरात माजी नगरसेवकाच्या गळ्यातील चेन खेचून नेणाऱ्या त्रिकूटाकडे रिव्हॉल्व्हर
By सदानंद नाईक | Published: April 2, 2023 04:28 PM2023-04-02T16:28:55+5:302023-04-02T16:29:26+5:30
उल्हासनगरात गुन्हेगारीच्या घटनेत वाढ झाली असून सुरक्षित ठिकाणेही धोकादायक झाली. कॅम्प नं-५ नेताजी गार्डन परिसरात काँग्रेसचे माजी नगरसेवक मोहन साधवानी राहतात.
उल्हासनगर : कॉंग्रेसचे माजी नगरसेवक मोहन साधवानी यांचा रात्री त्रिकुटाने पाठलाग करून कार पार्किंग करते वेळी एकाने गळ्यातील चेन खेचून पळून गेला. याप्रकरणी पोलिसांनी सीसीसी टीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता, त्यांच्याकडे रिव्हॉल्वर असल्याचे उघड झाले. याची दखल पोलीस विभागाने घेऊन त्रिकुटाच्या मार्गावर पोलीस पथके लागली आहे.
उल्हासनगरात गुन्हेगारीच्या घटनेत वाढ झाली असून सुरक्षित ठिकाणेही धोकादायक झाली. कॅम्प नं-५ नेताजी गार्डन परिसरात काँग्रेसचे माजी नगरसेवक मोहन साधवानी राहतात. शुक्रवारी रात्री उशिरा स्वतःच्या हॉटेल मधून ते घरी येऊन इमारत खाली कार पार्किंग केली. यावेळी एक जण येऊन साधवानी यांच्या सोबत झटापटी करून गळ्यातील सोन्याची चेन खेचून पळून गेला. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर, हिललाईन पोलिसांनी या गुन्ह्यां संदर्भात इमारत शेजारील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, मोहन साधवानी यांच्या गाडीच्या मागे तिघे जण लागले होते. तिघा पैकी एक जण थेट कार पार्किंग येथे येऊन साधवानी यांच्या सोबत हातापायी करीत गळ्यातील सोन्याची चेन खेचून पळून गेला.
हिललाईन पोलिसांना चोराचे त्रिकुट दिसल्याने, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची बारकाईने तपासणी केली असता, तिघा पैकी एकाने रिव्हॉल्वर बाहेर काढल्याचे दिसले. तर दुसऱ्या जवळी रिव्हॉल्वर सारखे हत्यार दिसले. यामुळे पोलीस अधिक सावधान होऊन, त्यांनी पोलीस पथके तयार करून त्रिकुटाच्या मागावर पाठविले. त्रिकुटाचा उद्देश चोरीचा की, मोहन साधवानी याना जिवेठार मारण्याचा होता? यातून पोलीस अधिक तपास करीत आहेत. अशी माहिती हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ रणजित ढेरे यांनी देऊन, त्रिकुट लवकरच गजाआड होण्याची शक्यता व्यक्त केली.