बाबो! लग्न करून घरी आले नवरा-नवरी पण तितक्यात आले पोलीस अन् जेलमध्ये काढली पहिली रात्र
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 11:56 AM2022-04-24T11:56:59+5:302022-04-24T11:58:28+5:30
Crime News : थाटामाटात लग्न करून घरी परतलेल्या तरुणाला त्याची पहिली रात्र आता जेलमध्येच काढावी लागली आहे.
नवी दिल्ली - मध्य प्रदेशमधील एका तरुणाला आपल्या गर्लफ्रेंडला धोका देणं चांगलंच महागात पडलं आहे. बॉयफ्रेंड लग्न करत असल्याचं समजताच तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तरुणाच्या घरी जाऊन त्याच्या लग्नाच्या दिवशीच त्याला अटक केली आहे. यामुळे थाटामाटात लग्न करून घरी परतलेल्या तरुणाला त्याची पहिली रात्र आता जेलमध्येच काढावी लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणाचे एका 20 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते.
लग्न करण्याचं वचन देत आरोपी राजकुमार तिच्यासोबत संबंध ठेवायचा. पण आता त्याने दुसऱ्याच मुलीशी लग्न केलं. यामुळे चिडलेली प्रेयसी थेट पोलीस ठाण्यात जाऊन पोहोचली. मध्य प्रदेशातील रीवा येथील हा प्रकार आहे. मुलीने सांगितलं की, तिला राजकुमारच्या लग्नाची माहितीही नव्हती. घडलेल्या प्रकाराची अचानक माहिती मिळताच तरुणीने पोलीस ठाणे गाठून पोलिसांत तक्रार केली.
तरुणाने आपल्यासह जिच्याशी लग्न केलं त्या मुलीलाही फसवलं असल्याचा आरोप त्याच्या प्रेयसीने केला आहे. प्रियकराच्या लग्नाची माहिती मिळताच तरुणीने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी वराला त्याच्या घरी पोहोचल्यानंतर अटक केली आहे. नवऱ्या मुलाला अटक करण्याचं कारण कळल्यानंतर नव्या नवरीला अक्षरशः रडू कोसळलं.
राजकुमारच्या अटकेनंतर त्याच्या घरात शांतता आहे. कालपर्यंत ज्या घरात लग्नाचा आनंद साजरा होत होता, तिथे आता शांतता आहे. या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. यानंतर राजकुमारला जेलमध्ये पाठवण्यात आलं आहे. या घटनेने नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.