Sandip Ghosh : कोलकाता निर्भया हत्या प्रकरणात ED ची एन्ट्री, आरोपी संदीप घोषच्या घरावर छापा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 10:08 AM2024-09-06T10:08:05+5:302024-09-06T10:19:18+5:30

Sandip Ghosh : कोलकात्यात ५ ते ६ ठिकाणी ईडीचे छापे सुरू आहेत. संदीप घोष आणि त्याच्याशी संबंधित इतर लोकांच्या ठिकाणांवर हा छापा टाकण्यात येत आहे.

rg kar hospital financial irregularities ed started conducting raids in sankrail beleghata Sandip Ghosh house | Sandip Ghosh : कोलकाता निर्भया हत्या प्रकरणात ED ची एन्ट्री, आरोपी संदीप घोषच्या घरावर छापा

Sandip Ghosh : कोलकाता निर्भया हत्या प्रकरणात ED ची एन्ट्री, आरोपी संदीप घोषच्या घरावर छापा

आरजी कर हॉस्पिटलच्या आर्थिक अनियमिततेप्रकरणी ईडीने संदीप घोष आणि त्याच्याशी संबंधित इतर लोकांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. कोलकातामध्ये ५ ते ६ ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू आहे. संदीप घोष आणि त्याच्याशी संबंधित इतर लोकांच्या ठिकाणांवर हा छापा टाकण्यात येत आहे.

CBI ने RG कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष आणि इतर तिघांना आर्थिक अनियमिततेच्या आरोपाखाली अटक केली होती. घोष यांचे सुरक्षा रक्षक अफसर अली (४४), रुग्णालयातील सेल्समन बिप्लव सिंघा (५२) आणि सुमन हजारा (४६) या तिघांना अटक करण्यात आली आहे. हे लोक हॉस्पिटलला साहित्य पुरवायचे.

संदीप घोष यांच्या प्राचार्यपदाच्या कार्यकाळात, संस्थेतील अनेक प्रकरणांमध्ये आर्थिक अनियमितता झाल्याची तक्रार आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे माजी उपअधीक्षक डॉ. अख्तर अली यांनी केली होती. त्यात त्यांनी संदीप घोष यांच्यावर रुग्णालयातील बेवारस मृतदेहांची तस्करी, जैव वैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीत भ्रष्टाचार आणि बांधकाम निविदांमध्ये घराणेशाहीचे आरोप केले होते. कोलकाता पोलिस यापूर्वी या प्रकरणाचा तपास करत होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयनेही हा तपास हाती घेतला.

१९ ऑगस्ट रोजी कोलकाता पोलिसांनी संदीप घोष यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम १२०B, ४२० आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ च्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर २४ ऑगस्ट रोजी सीबीआयने तपास हाती घेतला. या कलमांखालीच संदीप घोषला अटक करण्यात आली होती.

Web Title: rg kar hospital financial irregularities ed started conducting raids in sankrail beleghata Sandip Ghosh house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.