रियाला सुप्रीम कोर्टाने दिला दणका, प्रोटेक्टिव्ह ऑर्डरची याचिका फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 03:34 PM2020-08-06T15:34:19+5:302020-08-06T15:35:02+5:30
Sushant Singh Rajput Suicide : सुप्रीम कोर्टाने रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी प्रोटेक्टिव्ह ऑर्डरची याचिका दाखल केली होती. मात्र, कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली.
नवी दिल्ली - सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी दरदिवशी नवनवीन ट्विस्ट समोर येत आहेत. केंद्र सरकारने सीबीआय चौकशीला परवानगी दिल्यानंतर अचानक या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. ईडीने देखील रियाला चौकशीसाठी समन्स पाठवले असून तिचा सहकारी सॅम्युअलची ईडी चौकशी करत आहेत. सुप्रीम कोर्टाने रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी प्रोटेक्टिव्ह ऑर्डरची याचिका दाखल केली होती. मात्र, कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे बिहार पोलिसांचे पथक रियाची चौकशी करू शकते.
सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीसह ५ जणांविरोधात पाटणातील राजीव नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यांनी आपल्या तक्रारीत आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यासोबत अनेक गंभीर आरोप केले. रियाने पैशांसाठी सुशांतला फसवल्याचंही त्यांनी यात म्हटलं आहे. त्यामुळे सुशांत प्रकरण मनी लॉण्डरिंगशी संबंधित असल्यामुळे ईडीने गुन्हा दाखल केला आहे.ईडीने रियाला तिच्या मुंबईतील घरी आणि ईमेलमार्फत समन्स पाठवला आहे. ईडीची मुंबई येथील ब्रँचमध्ये रियाची तीन भागांमध्ये चौकशी होणार आहे. काल रियाचा सहकारी सॅम्युअल मिरांडाची ईडीने चौकशी केली आणि आज देखील चौकशी सुरु आहे.
सुशांत प्रकरण बिहार सरकारच्या शिफारसीनंतर केंद्राने सीबीआयकडे वर्ग केले आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने देखील रियाच्या वकिलांकडून सादर केलेल्या अंतरिम संरक्षणाची (प्रोटेटिव्ह ऑर्डर) विनंती नाकारली आहे.चांगल्या प्रतिभावंत अभिनेत्याचा असा मृत्यू झाला आहे. त्यामुळे याबाबत खरं सर्वांसमोर आलं पाहिजे. आता बिहार पोलीस रियाची चौकशी करेल, असे कोर्टाने म्हटले आहे.