काळ्या बाजारात नेताना भाताचा ट्रक पकडला, २५० गोण्या केल्या जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 02:02 AM2019-10-04T02:02:23+5:302019-10-04T02:02:54+5:30

अंबाडी - वज्रेश्वरी रस्त्यावर श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारने भरडाईसाठी हमी भावात खरेदी केलेल्या भाताचा ट्रक काळ््याबाजारात नेत असताना गुरु वारी सायंकाळी पकडला.

Rice truck caught in the black market, 250 pills seized | काळ्या बाजारात नेताना भाताचा ट्रक पकडला, २५० गोण्या केल्या जप्त

काळ्या बाजारात नेताना भाताचा ट्रक पकडला, २५० गोण्या केल्या जप्त

Next

वज्रेश्वरी : अंबाडी - वज्रेश्वरी रस्त्यावर श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारने भरडाईसाठी हमी भावात खरेदी केलेल्या भाताचा ट्रक काळ््याबाजारात नेत असताना गुरु वारी सायंकाळी पकडला. यात २५० भाताच्या गोण्या आढळल्या. काही महिन्यांपूर्वी श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी शहापूर येथे कर्नाटक येथून बेकायदा येणारा तांदूळ पकडला होता.

पालघर ते गोंदिया असे तब्बल २५० ते ३०० रूपये प्रती क्विंटल वाहतूक भत्ता घेऊन हा भात उचलला जातो. मात्र गोंदिया येथे भरडाईसाठी न नेता हा भात काळ््याबाजारात किंवा अहमदाबादमध्ये व्यापाऱ्यांना विकला जात असल्याची माहिती श्रमजीवी संघटनेचे युवक जिल्हाप्रमुख प्रमोद पवार आणि कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानुसार भात पकडण्यात आला. गोंदिया येथील मुकेश जैन यालाही गणेशपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सरकार खरेदी करत असलेल्या एक ते सव्वा लाख टन भाताच्या या वाहतुकीत सरकारची १० ते १२ कोटींची लूट करून हा भात काळ््याबाजारात विकून गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ स्थानिक शेतकऱ्यांकडून हमी भावाने भात खरेदी करत असते. हा भात भरडाईसाठी मिलमध्ये देऊन त्याची भरडाई करून तांदळाचा रास्त भाव दुकानात पुरवठा केला जातो. हे काम देताना स्थानिक मिलला प्राधान्य देण्याचे सरकारी निर्णयात नमूद केले आहे. याप्रमाणे दोन स्थानिक मिलला आम्ही १०० टक्के मिलिंग करण्यास तयार असल्याची हमी देणारे पत्रही महामंडळाकडे दिले आहे. असे असताना रक्कम खर्च करून हा भात गोंदिया, भंडारा, रायगड येथील मिलला देण्यात येतो. हा खरेदी केलेला भात काळाबाजारात विकला जातो आणि मग त्या बदल्यात तांदूळ देताना कर्नाटक किंवा आंध्र प्रदेश येथून जुना स्वस्त तांदूळ आणून दिला जातो.

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
पकडलेला ट्रक गणेशपुरी पोलिसांच्या ताब्यात दिला असून पुढील तपास आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रि या सहायक पोलीस निरीक्षक महेश सागडे आणि पोलीस उपनिरीक्षक रवींद्र आव्हाड करत आहेत. याबाबत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांना माहिती दिली आहे.
 

Web Title: Rice truck caught in the black market, 250 pills seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.