रिक्षा, कॅब काहीच मिळेना; पठ्ठ्याने परिवाहनची बसच पळविली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 01:28 PM2020-02-18T13:28:20+5:302020-02-18T13:32:27+5:30
रात्रीच्या वेळी तरुण घरी जाण्यासाठी रिक्षा, कॅब मिळते का हे पाहत होता. बराचवेळ प्रयत्न करूनही काही मिळाले नाही.
विकाराबाद : घरी जाण्यासाठी झोमॅटोवर जवळच्या हॉटेलमधून ऑर्डर देत डिलिव्हरी बॉयला लिफ्ट द्यायला सांगणाऱ्या तरुणाचा किस्सा आठवत असेलच. असाच काहीसा प्रकार तेलंगानाच्या राजधानीमध्ये घडला आहे. परंतू त्याचे हे कृत्य पोलिस ठाण्यात घेऊन गेले आहे.
घटना रविवारची आहे. झाले असे की, रात्रीच्या वेळी तरुण घरी जाण्यासाठी रिक्षा, कॅब मिळते का हे पाहत होता. बराचवेळ प्रयत्न करूनही काही मिळाले नाही. यामुळे त्याने बसस्टॉपच्या बाजुलाच उभी असलेली बस चक्क पळवून नेली. या प्रकारामुळे खळबळ उडाली.
महत्वाचे म्हणजे हा व्यक्ती बस स्थानकामध्येच काम करतो. त्याने तेलंगाना राज्य परिवहन मंडळाची बस स्टार्ट केली आणि धूम ठोकली. यानंत त्या पठ्ठ्याने घराजवळ पोहोचताच बस रस्त्याकडेला लावली आणि पळून गेला.
नवजात बालकांचेही आधारकार्ड बनवता येते; पण प्रक्रिया थोडी वेगळी आहे...
इकडे बस चोरीला गेल्याने डेपोमध्ये खळबळ उडाली. पोलिसांना ही बस शहरातच रस्त्याकडेला आढळली. त्यांनी चौकशी केली असता कर्मचाऱ्याचे नावही समजले. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.