सिगारेट विकणाऱ्या महिलेवर रिक्षाचालकाचा बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 07:44 PM2022-09-19T19:44:41+5:302022-09-19T19:45:11+5:30
भाईंदर पूर्व रेल्वे स्थानक बाहेरील शिवकृपा मेडिकल जवळच्या रिक्षा स्टॅन्ड भागात शनिवारी मध्यरात्री एक महिला सिगारेट आदीची विक्री करत होती .
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - मध्यरात्रीनंतर एका ३० वर्षीय महिलेस मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केल्या प्रकरणी रिक्षा चालकास गुन्हे शाखेने १२ तासात अटक केली आहे . आरोपीला २१ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत .
भाईंदर पूर्व रेल्वे स्थानक बाहेरील शिवकृपा मेडिकल जवळच्या रिक्षा स्टॅन्ड भागात शनिवारी मध्यरात्री एक महिला सिगारेट आदीची विक्री करत होती . त्यावेळी अनोळखी रिक्षा चालकाने सर्व सिगारेट विकत घेण्याच्या बहाण्याने त्या महिलेस रिक्षात बसवले . तिला जबरदस्तीने केबिन - फाटक रोडच्या अंधाऱ्या गल्लीत नेले . तेथे तिला मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला . या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता .
गुन्ह्याचे गांभीर्य पाहता गुन्हे शाखेचे उपायुक्त विजयकांत सागर व सहायक आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल राख , सहायक निरीक्षक नितीन बेंद्रे , कैलास टोकले , पुष्पराज सुर्वे सह वाडीले , संजय शिंदे , प्रशांत विसपुते , सचिन सावंत , मनोहर तावरे , राजवीरसिंग संधू , प्रवीणराज पवार , सतीश जगताप , बाळासाहेब गर्जे, सुशील पवार , समीर यादव , सनी सूर्यवंशी यांच्या पथकाने विविध दिशेने तपास सुरु केला .
आरोपी रिक्षा चालकाची कोणतीच माहिती नसल्याने पोलिसांनी चौकशी व खबऱ्यांसह तांत्रिक विश्लेषण , सीसीटीव्ही फुटेज आदींच्या मदतीने रिक्षाचा क्रमांक आणि मालक शोधून काढला . त्याची चौकशी केल्यावर त्या रात्री रिक्षा चालवणारा अनिल कुमार उर्फ कुंदन ओमप्रकाश मिश्रा ( २८) रा . इंदिरा नगर, नवघर , भाईंदर पूर्व हा असल्याचे निष्पन्न झाले . गुन्हे शाखेच्या पथकाने रिक्षा चालक आरोपीला रविवार सप्टेंबर रोजी अटक केली .
गेल्याच महिन्यात शिकवणी साठी जाणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीशी अभद्र वर्तणूक करणाऱ्या रिक्षा चालक कृष्णकुमार बलदेव मौर्या ( ४६) रा . एव्हरग्रीन सिटी, जीसीसी क्लब जवळ , मीरारोड ह्याला अटक करण्यात आली होती . त्यावेळी मुलीने घाबरून चालत्या रिक्षातून उडी मारली होती .