कणकवलीत आजाराला कंटाळून रिक्षा व्यवसायिकाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 07:55 PM2021-05-02T19:55:42+5:302021-05-02T19:56:29+5:30

Suicide in Kankavali : घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Rickshaw driver commits suicide after getting sick in Kankavali | कणकवलीत आजाराला कंटाळून रिक्षा व्यवसायिकाची आत्महत्या

कणकवलीत आजाराला कंटाळून रिक्षा व्यवसायिकाची आत्महत्या

Next
ठळक मुद्देवासुदेव लाड हे रिक्षा व्यावसायिक होते. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यामुळे ते घरीच असत. आजारपणाला कंटाळून नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

कणकवली :  कणकवली शहरातील वासुदेव दत्ताराम लाड (५०, रा. कांबळीगल्‍ली) यांनी हळवल रेल्वे फटकानजीक रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
       

वासुदेव लाड हे रिक्षा व्यावसायिक होते. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यामुळे ते घरीच असत. आजारपणाला कंटाळून नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी वासुदेव लाड यांनी चिठ्ठी लिहून ठेवल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. ती चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
       

शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास रेल्वे ट्रॅकमन गस्त घालत असताना त्यांना हळवल रेल्वे फटका नजीक हा मृतदेह आढळला. रेल्वेची धडक बसून डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. ट्रॅकमनने कणकवली रेल्वे स्टेशन मास्तर यांना संबधित  घटनेची माहिती देताच रेल्वे सुरक्षा बलाचे जवान राजेश कांदळकर यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. कणकवली पोलिसांनाही संबधित  घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. कणकवली पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यू म्हणून या घटनेची नोंद  करण्यात आली आहे.  वासुदेव लाड यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली असा परिवार आहे.

Web Title: Rickshaw driver commits suicide after getting sick in Kankavali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.