हेल्मेट न घातल्याचा दंड आकारला चक्क रिक्षा चालकाला, वाहतूक पोलिसांचा अजब कारभार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 05:12 PM2022-03-03T17:12:08+5:302022-03-03T17:13:17+5:30
Rickshaw driver fined for not wearing helmet : या ई-चलान कारवाईचा या रिक्षा चालकाला मनस्ताप सहन करावा लागला असून वाहतूक पोलिसांच्या अजब कारवाईचा प्रकार समोर आला आहे.
कल्याण- एखादा नियम तोडल्यास ई चलान पद्धतीने वाहन चालकांना वाहतूक पोलिसांकडून दंड आकारला जातो. मात्र कल्याणमधील द्वारली येथे राहणारे गुरुनाथ चिकणकर हे रिक्षा चालक आहे. त्यांनी हेल्मेट न घातल्याने त्यांना 500 रुपये दंड आकारण्याच्या अजब बाब समोर आली आहे. या ई-चलान कारवाईचा या रिक्षा चालकाला मनस्ताप सहन करावा लागला असून वाहतूक पोलिसांच्या अजब कारवाईचा प्रकार समोर आला आहे.
गुरुनाथ हे द्वारली गावात राहता. ते रिक्षा चालवितात. त्यांना ई चलान आले. त्यांना त्यांना पाचशे रुपयांचा दंड आकारला होता. मात्र त्यांनी कोणत्या नियमाचे उल्लंघन केले याची त्यांना कल्पना नव्हती. हा दंड भरणार होते. दहा ते बारा दिवस त्यांनी विलंब गेला. त्यांनी या बाबत त्यांच्या मेहूण्यांकडे विचारणा केली असता त्यांनी ई चलान पाहून सांगितले की, हेल्मेट न घातल्याने हा दंड आकारला आहे. तेव्हा गुरुनाथ हे चक्रावूनच गेले. त्यांनी दंड न भरल्याने त्यांना चक्क कोर्टाकडून समन्स आले आहे. मात्र त्यांना जे चलान आले त्यावर त्यांच्या रिक्षाचा गाडी नंबर, पत्ता आणि नाव आहे. मात्र हे चलान एका दुचाकी चालकाला आकारण्यात आले. जो कांदिवली येथील आहे. त्याने हेल्मेट घातले नव्हते. ही प्राथमिक बाब समोर आली आहे.
गुरुनाथ यांनी विठ्ठलवाडी येथील पोलिसांकडे विचारणा केली असता त्यांनी हात वरती करीत ई चलानचा दंड आम्हाला काही माहिती नाही. ठाण्या जाऊन विचारा असे उत्तर दिले. मात्र गुरुनाथ यांनी सांगितले की, माझी यात काही एक चूक नसताना मी दुस:याने केलेल्या चुकीचा दंड का भरायचा असा सवाल उपस्थित केला आहे. वाहतूक पोलिसांच्या चूकीचा दंड मी का भरु. त्यांनी चूक सुधारावी. या सगळ्य़ा प्रकारामुळे गुरुनाथ यांना मानसिक त्रस झाला आहे. वाहतूक पोलिसांनी शहानिशा करुन दंड आकारला पाहिजे. अन्यथा यातून वाहतूक पोलिसांच्या ई चलान दंड आकारणी वाहन चालकांना त्रस होईल. गुरुनाथ यांचे भाऊ मदन चिकणकर हे पेशाने वकिल आहे. त्यांनीही पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.