रिक्षाचालक चालवत होता वेश्याव्यवसाय; इंटरनेटचा गैरवापर करून सुरु होता गोरखधंदा 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 05:50 PM2020-02-11T17:50:07+5:302020-02-11T17:51:06+5:30

बोगस ग्राहक पाठवून पोलिसांना छापा टाकला आणि २ मुलींची सुटका केली.

A rickshaw driver was operating a prostitution racket by misusing the Internet | रिक्षाचालक चालवत होता वेश्याव्यवसाय; इंटरनेटचा गैरवापर करून सुरु होता गोरखधंदा 

रिक्षाचालक चालवत होता वेश्याव्यवसाय; इंटरनेटचा गैरवापर करून सुरु होता गोरखधंदा 

googlenewsNext
ठळक मुद्दे पोलिसांनी ३० आणि २१ वर्षीय दोन मुलींची सुटका केली असून आरोपी यादवला अटक केली. मोठ्या आर्थिक मोबदल्यातून ७० टक्के रक्कम आरोपी यादव स्वतः घेत असे. बऱ्याच कालावधीपासून हे वेश्याव्यवसायाचे रॅकेट चालविण्यात सक्रिय होते असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

मुंबई - इंटरनेटचा गैरवापर करून 'Massage Republican.Com' या साईटवर स्वतःचा मोबाईल क्रमांक प्रसिद्ध करून त्याद्वारे काही आरोपींची टोळी भारतीय महिलांचा वापर करून देहविक्रीचा गोरखधंदा चालवत असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे कक्ष - १चे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे बोगस ग्राहक पाठवून पोलिसांना छापा टाकला आणि २ मुलींची सुटका केली.

पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी माहितीची शहनिशा करण्यासाठी 'Massage Republican.Com' या साईटवरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर १० फेब्रुवारीला बोगस ग्राहक पाठवले असता मोबाइलधारकाने त्याला साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नुरी मशिदीजवळील हॉटेल स्काय वे इन येथे बोलावले. त्यानुसार कक्ष - १० च्या पोलिसांनी नियोजनबद्ध छाप्याची तयारी केली. नंतर बोगस ग्राहकाला पाठवून हॉटेल स्काय वे इन येथे पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी दोन बळीत  मुलींसह एक इसम आढळून आला. एका मुलीचे वय ३० तर दुसऱ्या मुलीचे वय २१ असं आहे.  अधिक चौकशी केली असता तो इसम उच्चभ्रू भारतीय आणि विदेशी ग्राहकांना वेश्यागमनासाठी प्रलोभन देऊन आकर्षित करत असल्याचे उघड झाले. या अटक इसमाचे नाव जातुन महादेव यादव (३७) असं असून तो अंधेरी पूर्वेकडील चानक कॉलनीत राहतो. महत्वाचे म्हणजे तो रिक्षाचालक आहे. 

मसाज करायला गेला अन् सेक्स करण्यास नकार दिल्याने हाडं मोडून आला

नागपुरातील हॉटेल क्रिष्णामध्ये सेक्स रॅकेट : पोलिसांचा छापा

182 महिलांसोबत शरीरसंबंध ठेवून MMS बनविले; बड्या उद्योगपती घराण्यातील दोघांना अटक

धक्कादायक! स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

जातुन महादेव यादव (३७), रिक्षाचालक
जातुन महादेव यादव (३७), रिक्षाचालक



पोलिसांनी ३० आणि २१ वर्षीय दोन मुलींची सुटका केली असून आरोपी यादवला अटक केली. त्याच्याकडून मोबाईल फोन, दोन सिमकार्ड आणि १७५०० रुपये पोलिसांनी हस्तगत केले. या आरोपीविरोधात बेकायदेशीरपणे देह विक्री व्यवसाय करण्यासाठी गरजू मुलींना भाग पडल्याच्या कारणामुळे पिटा अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मुलींना मिळत असलेल्या मोठ्या आर्थिक मोबदल्यातून ७० टक्के रक्कम आरोपी यादव स्वतः घेत असे. या गुन्ह्यातील अटक आरोपी आणि पाहिजे असलेला आरोपी हे बऱ्याच कालावधीपासून हे वेश्याव्यवसायाचे रॅकेट चालविण्यात सक्रिय होते असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

Web Title: A rickshaw driver was operating a prostitution racket by misusing the Internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.