राजभवनातून दुचाकी चोरणाऱ्या सराईतास अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 09:15 PM2019-01-02T21:15:28+5:302019-01-02T21:16:49+5:30

सनुजाकुमार रमेश पाढी (२६) असे या आरोपीचे नाव आहे. चोरलेली दुचाकी त्याने कुर्ला येथे विक्रीसाठी नेली होती. मात्र त्या दुचाकीची विक्री होण्यापूर्वीच पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

Riding the two-wheeler stolen from the Raj Bhavan | राजभवनातून दुचाकी चोरणाऱ्या सराईतास अटक 

राजभवनातून दुचाकी चोरणाऱ्या सराईतास अटक 

Next
ठळक मुद्देत्या दुचाकीची विक्री होण्यापूर्वीच पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर मोहम्मद यांनी सुरेश यांना फोनवरून कळवले.

मुंबई - राजभवनात संदेश वाहकांसाठी देण्यात आलेली दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोराला माता रमाबाई मार्ग (एमआरए) पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. सनुजाकुमार रमेश पाढी (२६) असे या आरोपीचे नाव आहे. चोरलेली दुचाकी त्याने कुर्ला येथे विक्रीसाठी नेली होती. मात्र त्या दुचाकीची विक्री होण्यापूर्वीच पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

अतिमहत्वाचे, संवेदनशील स्थान म्हणून ओळख असलेल्या राजभवनत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतो. राजभवनाशी संदर्भात असलेल्या प्रत्येक गोष्टी या कटाक्षाने पाहिल्या जातात. तरी देखील राजभवनातील संदेश वाहकासाठी वापरण्यात येणारी दुचाकी चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली. राजभवनात संदेश वाहक म्हणून कार्यरत असलेल्या सुरेश मोरे यांना राजभवनातील पत्रे ही विविध शासकिय, संवेदनशील आणि अतिमहत्वाच्या ठिकाणी जलदगतीने पोहचण्यासाठी शासनाकडून दुचाकी देण्यात आली आहे. दरम्यान २१ डिसेंबर रोजी सुरेश हे दुचाकी सर्व्हिसिंगसाठी मॅकेनिक मोहम्मद वासिम शेख यांच्या वालचंद हिराचंद मार्ग, बॅलार्ड पिअर पेट्रोलपंपजवळील गॅरेजमध्ये घेऊन गेले होते. गाडी दुरूस्ती केल्यानंतर मोहम्मद यांनी दुचाकी २३ कोचीव स्ट्रीट, मधुबन बिल्डिंगजवळील फुटपाथजवळ उभी केली. मात्र घाईगडबडीत ते दुचाकीची चावी काढण्यास विसरले. दरम्यान दुपारी २.१५  वाजता मोहम्मद हे गॅरेजमधून बाहेर पडले. त्यावेळी त्यांना राजभवनाच्या वापरासाठी असलेली  दुचाकी जागेवर दिसली नाही. दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर मोहम्मद यांनी सुरेश यांना फोनवरून कळवले. त्यानंतर सुरेश आणि मोहम्मद यांनी माता रमाबाई मार्ग पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली. 

दरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील सर्व सीसीटिव्ही खंगाळून दुचाकी चोरणाऱ्या आरोपीची ओळख पटवली. खबऱ्यांच्या मदतीने आरोपी सनुजाकुमार विनोबाभावेनगर कुर्ला येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सनुजाकुमारला अटक केली. मूळचा ओडिसाचा  रहिवाशी असलेला सनुजाकुमार हा कुर्ला परिसरातील हाॅटेलमध्ये वेटरचे काम करत असून पैशांची गरज असल्यामुळे त्याने हे कृत्य केल्याची कबूली त्याने पोलिसांना दिली. सध्या सनुजाकुमार हा पोलिसांच्या कोठडीत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Riding the two-wheeler stolen from the Raj Bhavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.