मुक्ताईनगर मारहाण प्रकरणानंतर २०० जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 23:28 IST2022-07-23T23:20:30+5:302022-07-23T23:28:56+5:30
Riot case : या घटनेनंतर पोलिस स्टेशनसमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसने ठिय्या आंदोलन केले. यानंतर प्रवर्तन चौकात रोडवर झोपून आंदोलन करण्यात आले. चौकातील दुकानदारांना बळजबरीने दुकाने बंद करण्यास भाग पाडण्यात आले.

मुक्ताईनगर मारहाण प्रकरणानंतर २०० जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा
मुक्ताईनगर (जि. जळगाव) : एका तरुणीच्या बदनामीकारक व्हायरल पोस्टवरून नगरसेविकेच्या पुत्रास भर चौकात चोप दिल्याची घटना शुक्रवारी घडली होती. या प्रकारानंतर जमलेल्या २०० जणांविरुद्ध शनिवारी रात्री दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर पोलिस स्टेशनसमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसने ठिय्या आंदोलन केले. यानंतर प्रवर्तन चौकात रोडवर झोपून आंदोलन करण्यात आले. चौकातील दुकानदारांना बळजबरीने दुकाने बंद करण्यास भाग पाडण्यात आले. १५० ते २०० च्या संख्येतील जमावाने काही भागात दहशत माजविण्याच्या प्रयत्न केला. यात गोपाळ चौधरी यांचे घराच्या जिन्याच्या काचा फोडण्यात आल्या. महिलांना अर्वाच्य शिविगाळ करून दरवाजा तोडून आत घुसण्याचा प्रयत्न झाला. तसेच येथील एका घराला लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नासधूस करण्याचा प्रयत्न झाला.
याप्रकरणी गोपाळ चौधरी, रमेश भिवा कोळी, शकुंतला अनिल भोई यांच्या फिर्यादीवरून १५० ते २०० जणांविरुद्ध दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.