शिळ - डायघर परिसरात पोलिसांची पुन्हा हातभट्टीच्या दारुवर कारवाई, ५० हजारांचे साहित्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 05:14 PM2017-12-16T17:14:01+5:302017-12-16T17:15:48+5:30
शिळ डायघर परिसरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पोलिसांनी हातभट्टीच्या दारुसाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ठाणे - शिळ डायघर पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे ५० हजार रुपये किमतींची गावठी दारु आणि त्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी शिळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या घटनेत शिळ डायघर परिसरातील लहु म्हात्रे (७१) यांनी स्वत:च्या राहत्या मोठी देसाई गाव परिसरातील जागेत हातभट्टीची दारु तयार करण्यासाठी लागणारे कच्चा माल, नवसागर सारखे पदार्थ मिश्रीत करुन तयार केलेले रसायन, असा एकूण ४२ हजार ९०० रुपये किमंतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी म्हात्रे यांच्यासह अन्य तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसºया घटनेमध्ये एका अज्ञात इसमाने प्रोव्हीबिशन गुन्ह्याचा बचाव व्हावा या उद्देशाने पडले गावातील शिवारात शेतजमीमध्ये चिखलात १९ हजार रुपये किमंतीचे प्लास्टीकचे पांढºया रंगाचे १० ड्रम, गुळ व नवसागर मिश्रीत रसायन, ड्रममध्ये १८० लिटर वॉश या प्रमाणे १ हजार ८०० लीटर वॉश असा एकूण २१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दोनही प्रकरणी शिळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.