सचिन वाझेंच्या अटकेनंतर गेल्या 4 तासांपासून रियाज काझी यांची NIA कडून चौकशी सुरु 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 03:00 PM2021-03-14T15:00:16+5:302021-03-14T15:02:42+5:30

Sachin vaze Arrested : आता NIA कडून सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाझ काझी यांची गेल्या तीन तासांपासून चौकशी सुरु आहे. 

riyaz Kazi has been under investigation by the NIA for the last 4 hours after Sachin vaze | सचिन वाझेंच्या अटकेनंतर गेल्या 4 तासांपासून रियाज काझी यांची NIA कडून चौकशी सुरु 

सचिन वाझेंच्या अटकेनंतर गेल्या 4 तासांपासून रियाज काझी यांची NIA कडून चौकशी सुरु 

Next
ठळक मुद्दे सचिन वाझे यांचे निकटवर्तीय आणि पोलीस अधिकारी रियाझ काझी हे गेले अनेक वर्ष मुंबई पोलीस दलात काम करत आहेत

२५ फेब्रुवारीला प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार प्रकरणी एनआयएने शनिवारी रात्री ११.५० वाजता सचिन वाझेंना अटक करण्यात आली आहे. काल १३ तास NIA कडून सचिन वाझे यांची झाडाझडती घेण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. या अटकेमुळे मुंबई पोलिस दलात खळबळ उडाली आहे. आता NIA कडून सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाझ काझी यांची गेल्या 4 तासांपासून चौकशी सुरु आहे. 

 

 

सचिन वाझे यांचे निकटवर्तीय आणि पोलीस अधिकारी रियाझ काझी हे गेले अनेक वर्ष मुंबई पोलीस दलात काम करत आहेत. सध्या रियाझ काझी हे सीआययू विभागात सचिन वाझे हे कार्यरत आहेत. अलीकडेच जानेवारी महिन्यात टीआरपी घोटाळ्याप्रकरणी केलेल्या कामगिरीबद्दल बेस्ट डिटेक्शन म्हणून मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी CIU चे सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत सांडभोर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे, नितीन लोंढे, संतोष कोटवान आणि रियाझ काझी यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. 

 

 

सचिन वाजेंना अडकविण्यात आलं; भावाने दिली पहिली प्रतिक्रिया #SachinVaze #Arrest #brother #Nia

Posted by Lokmat on Sunday, March 14, 2021

आता NIA सचिन वाझे यांचे जवळचे मित्र रियाझ काझी यांच्या चौकशीनंतर CIU विभागातील आणखी काही पोलिसांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच विक्रोळी पोलीस ठाण्यातील पोलिस देखील NIA च्या चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. कारण, १८ फेब्रुवारीला विक्रोळी पोलिसांनी कोणत्या कागदपत्रांच्या आधारे आणि कोणत्या पोलीस अधिकाऱ्याच्या इशाऱ्यावरून स्कॉर्पिओ चोरीस गेल्याची तक्रार दाखल केली गेली, याचा तपास NIA करू शकते. 

अटकेपूर्वी तब्बल 13 तास सचिन वाझे यांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली.

Posted by Lokmat on Sunday, March 14, 2021

Web Title: riyaz Kazi has been under investigation by the NIA for the last 4 hours after Sachin vaze

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.