सचिन वाजेला लुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 08:32 AM2023-03-04T08:32:16+5:302023-03-04T08:32:39+5:30

पेमेंट स्लिप भरत असताना अनोळखी व्यक्ती त्याच्याजवळ गेली आणि पेमेंट स्लिप भरायची काय गरज आहे? बाहेरील मशीनमध्ये पैसे भरले की ते तुमच्या खात्यामध्ये जमा होतील, असे म्हणाला.

Robbed at Sachin Waje in bank at deposit machine | सचिन वाजेला लुटले

सचिन वाजेला लुटले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बँक खात्यात पैसे भरायला गेलेल्या सचिन वाजे याचे लाखो रुपये घेऊन अनोळखी व्यक्तीने पळ काढल्याचा प्रकार खार पोलिसांच्या हद्दीत घडला असून, त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वाजे हा भांडूप परिसरातील राहणारा असून, तो सफाई कर्मचारी आहे. त्याने खार पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, १ मार्च रोजी तो बँक ऑफ इंडियाच्या खारमधील शाखेत १ लाख रुपये भरायला गेला होता. पेमेंट स्लिप भरत असताना अनोळखी व्यक्ती त्याच्याजवळ गेली आणि पेमेंट स्लिप भरायची काय गरज आहे? बाहेरील मशीनमध्ये पैसे भरले की ते तुमच्या खात्यामध्ये जमा होतील, असे म्हणाला. हे करताना त्याने बँकेतील एका महिला अधिकाऱ्याकडे बघून ही बाब सांगितली. ज्यांचे त्या व्यक्तीकडे लक्षच नव्हते. वाजेला ती व्यक्ती ही बँकेतील कर्मचारी असल्याचे वाटून त्याने भामट्याकडे ५०० रुपयांचे दोन बंडल असे एकूण १ लाख रुपये रोख दिली. वाजेला घेऊन ती व्यक्ती बँकेच्या बाहेरच्या मशीनकडे गेला आणि मशीनमध्ये ५०० रुपयांच्या २०० नोटा भरल्या. तेव्हा त्यातील २३ नोटा मशीनने न स्वीकारल्याने वाजेला त्या व्यक्तीने त्या नोटा बँकेतून बदलून आण म्हणून सांगितले. तो आत गेल्यावर भामटा तिथून पसार झाला.

Web Title: Robbed at Sachin Waje in bank at deposit machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.