बंदुकीचा धाक दाखवून सराफाला लुटले; घटना सीसीटीव्हीत कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 21:04 IST2021-03-02T21:04:05+5:302021-03-02T21:04:48+5:30
Robbed the jweller at gunpoint : त्याने स्वतः कडील बंदूक काढून सराफास ठार मारण्याची धमकी दिली.

बंदुकीचा धाक दाखवून सराफाला लुटले; घटना सीसीटीव्हीत कैद
मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या एका सराफा दुकानात बंदुकीचा धाक दाखवून साडे सतरा लाखांचा ऐवज लुटण्यात आल्याची घटना घडली आहे. सदर घटना दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. भाईंदर पूर्वच्या नवघर पोलिस स्टेशनच्या हद्दित नवघर मार्गावर कामधेनु इमारतीत एक सराफा दुकान आहे. सोमवारी ४ च्या सुमारास एक अनोळखी इसम खरेदीच्या बहाण्याने आत शिरला. त्याने स्वतः कडील बंदूक काढून सराफास ठार मारण्याची धमकी दिली.
दुकानातील १ लाख ७० हजार रोख, एक मोबाइल व ४५० ग्रॅम वजनाच्या कच्चा सोन्याच्या ८ लगडी असा एकूण १७ लाख ४९ हजार रूपयांचा ऐवज लुटून नेला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषण नुसार तपास करत आहेत.