कोरोना अधिकारी असल्याचे सांगत व्यक्तीला लुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 01:44 AM2020-07-06T01:44:15+5:302020-07-06T01:45:01+5:30
याप्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मुंबई : आपण कोरोना अधिकारी असल्याचे सांगत दोघांनी एका व्यक्तीच्या एटीएममधून ५४ हजार रुपये काढल्याची घटना चेंबूरमध्ये घडली आहे. ३0 जून रोजी सायंकाळी ६ वाजता अब्दुल शेख (४९) हे चेंबूरच्या मार्ग क्रमांक ११ येथून जात असताना, सरस्वती विद्यालय येथे दोघांनी त्यांना अडविले. यावेळी त्या दोघांनी शेख यांना आपण कोरोना अधिकारी असल्याचे सांगत त्यांची कागदपत्रांची बॅग तपासली.
यावेळी बॅगेतील एटीएम व पिन नंबर हातचलाखीने मिळवत बँक खात्यातील ५४ हजार काढले. याप्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे प्रकटीकरण शाखेने गुन्हा घडलेल्या ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या गाडीचा नंबर मिळवत गाडीच्या मालकाकडे तपास करून आरोपी सोहन वाघमारे यास अटक केली आहे. पोलीस आरोपीच्या साथीदाराचा शोध घेत आहेत.