केडीएमसीचे अधिकारी असल्याची बतावणी करीत वृद्धाला लुटले; दोघांपैकी एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 08:30 PM2022-08-25T20:30:06+5:302022-08-25T20:33:12+5:30

१९ जूनला टिळकनगर पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरोधात दाखल तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला होता. 

Robbed old man pretending to be KDMC official | केडीएमसीचे अधिकारी असल्याची बतावणी करीत वृद्धाला लुटले; दोघांपैकी एकाला अटक

केडीएमसीचे अधिकारी असल्याची बतावणी करीत वृद्धाला लुटले; दोघांपैकी एकाला अटक

Next

डोंबिवली - सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीला केडीएमसीचे अधिकारी असल्याची बतावणी करीत त्याच्याकडील ७ हजार ६०० रूपये लुबाडणाऱ्या दोन भामटयांपैकी एकाला टिळकनगर पोलिसांनी काल उल्हासनगरमध्ये सापळा लावून अटक केली. सोमनाथ बाबूराव कांबळे (वय २७) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो पूर्वी मनपात कंत्राटावर स्वच्छता मार्शल म्हणून कार्यरत होता.

एक वयोवृद्ध गृहस्थ हे १८ जूनला दुपारी १२ च्या सुमारास ९० फिट रोड येथून कामानिमित्त जात होते. त्यावेळी दुचाकीवरून त्यांच्याजवळ आलेल्या दोघांनी आम्ही केडीएमसीचे अधिकारी आहोत, तुम्ही सार्वजनिक रोडवर धुम्रपान का करता, ३० हजार रूपये दंड भरा अशी बतावणी केली. त्या वृध्दाकडील ७ हजार ६०० रूपये काढून घेऊन त्यांनी धूम ठोकली. याप्रकरणी १९ जूनला टिळकनगर पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरोधात दाखल तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला होता. 

ज्याठिकाणी लुबाडले त्याठिकाणचे सीसीटिव्ही फुटेज तपासले असता दोघांचे चेहरे दिसून आले. त्यांची ओळख पटविण्याकामी आणि त्यांना पकडण्यासाठी वरीष्ठ पोलीस निरिक्षक अजय आफळे आणि  प्रभारी (गुन्हे विभाग) पोलीस निरिक्षक पांडुरंग पिठे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रवीण बाकले, पोलीस उपनिरिक्षक बाळासाहेब कोबरणे, पोलीस नाईक दिपक महाजन, पोलिस हवालदार श्याम सोनवणे, अशोक करमोडा, सफौ नवले आदिंचे पथक नेमण्यात आले होते. या पथकाने उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या कांबळेला सापळा लावून अटक केली. त्याच्याकडून ३ हजारांची रोकड आणि गुन्हयात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. त्याचा अन्य एक साथीदार फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहीती वरीष्ठ पोलीस निरिक्षक आफळे यांनी दिली.

तत्काळ संपर्क साधावा

आपल्या परिसरात महापालिका तसेच पोलीस अधिकारी अथवा कर्मचारी असल्याची बतावणी करीत असेल तर त्या फसवणुकीला बळी न पडला तत्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधा असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी नागरीकांना केले आहे.
 

Web Title: Robbed old man pretending to be KDMC official

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.