चाकूच्या धाकावर प्रवाशास लुटले; चोरटे पोलिसांच्या गळाला लागले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 04:43 PM2022-05-29T16:43:04+5:302022-05-29T16:54:15+5:30

Robbery News : रेल्वेस्थानक परिसरातील घटना : अंगठीसह रोख जबरीने नेली होती हिसकावून

Robbed the passenger at knife point; The thieves hit the policeman in the neck | चाकूच्या धाकावर प्रवाशास लुटले; चोरटे पोलिसांच्या गळाला लागले

चाकूच्या धाकावर प्रवाशास लुटले; चोरटे पोलिसांच्या गळाला लागले

googlenewsNext

वर्धा : रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी ऑटोतून जाणाऱ्या प्रवाशाला चक्क ऑटोचालक व त्याच्या मित्राने चाकूचा धाक दाखवून त्याच्याजवळील सोन्याची अंगठी आणि आणि रोख रक्कम जबरीने हिसकावून पळ काढला. ही घटना २८ रोजी भल्या पहाटे ६ वाजताच्या सुमारास रेल्वेस्थानक परिसरात घडली. याची तक्रार पोलिसांना प्राप्त होताच शहर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपींचा शोध लावून त्यांच्या मुसक्या आवळून हिसकावून नेलेला ऐवज हस्तगत करुन गुन्हा उघडकीस आणला.

श्रीकांत गिरीश तिवारी (२८) रा. अकाेला. हा हिंगणघाट येथे त्याच्या पत्नीकडे जाण्यासाठी अकोला येथून वर्ध्याला आला. मात्र, वर्ध्यावरुन हिंगणघाटकडे जाण्यासाठी पहाटे एकही गाडी नसल्याने तो पहाटे ६ वाजताच्या सुमारास रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी एका ऑटोत बसला. ऑटोचालकासोबत आणखी एक जण बसून होता. श्रीकांत हा रेल्वेस्थानक परिसरात पोहचला असता तो लघूशंकेसाठी उतरला असता ऑटोचालक आणि त्याचा मित्र श्रीकांतजवळ गेला आणि चाकूचा धाक दाखवून तेरे पास जितने भी पैसे है वो सब दे, असे म्हणत त्याच्या बोटातील सोन्याची अंगठी आणि खिशातील रोख रक्कम असा एकूण २३ हजार २०० रुपयांचा ऐवज जबरीने हिसकावून ऑटो घेऊन पळ काढला.

अखेर घाबरलेल्या श्रीकांत याने तत्काळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबतची तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीच्या शोधार्थ पथक रवाना केले असता अवघ्या काही तासांतच पोलिसांनी आरोपी विक्की बाबूलाल सोळंकी ( २६) रा. इतवारा बाजार आणि सूरज सुमेरसिंग गिरी (१९) रा. हट्टी पोस्ट फुपटा ता. मानोरा जि. वाशिम यांना ताब्यात घेत विचारपूस केली. पोलिसी हिसका दाखवताच त्यांनी चोरीची कबूली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून हिसकावून नेलेले मुद्देमाल हस्तगत केला.

Web Title: Robbed the passenger at knife point; The thieves hit the policeman in the neck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.