नवरी जोमात, नवरदेव कोमात! लग्नानंतर 60 हजार, 4 मोबाईल घेऊन वधू पसार अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 01:04 PM2023-09-11T13:04:58+5:302023-09-11T13:10:34+5:30

नवरदेवाचे 60 हजार रुपये आणि 4 फोन चोरून पळ काढला.

robber brides of azamgarh married youths of haryana absconded with rs 60000 and 4 mobiles | नवरी जोमात, नवरदेव कोमात! लग्नानंतर 60 हजार, 4 मोबाईल घेऊन वधू पसार अन्...

नवरी जोमात, नवरदेव कोमात! लग्नानंतर 60 हजार, 4 मोबाईल घेऊन वधू पसार अन्...

googlenewsNext

उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नवरीने नवरदेवाच्या पैशांवर डल्ला मारला आहे. नवरदेवाचे 60 हजार रुपये आणि 4 फोन चोरून पळ काढला. लग्नासारख्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना उत्तर प्रदेशच्या पूर्वांचलमधून समोर आली आहे. जिथे लग्नानंतर दोन नववधूंनी त्यांच्या नवरदेवांना लुटून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा पूर्ण तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणातील दोन तरुण उत्तर प्रदेशातील आझमगड येथे लग्नासाठी आले होते. ज्यामध्ये हरियाणाच्या खुर्रमपूर येथील रहिवासी राम अवतार आणि वावरम येथील जतिन यांचा विवाह आझमगड येथील दोन मुलींसोबत निश्चित करण्यात आला होता. राम अवतार आणि जतीन काल लग्नासाठी निजामाबादला पोहोचले होते. जिथे मुलीच्या बाजूचे आणि मुलाच्या बाजूचे सर्व लोक निजामाबादच्या शीतला मंदिरातपोहोचले होते. जिथे लग्नाचे सर्व विधी पार पडले.

संध्याकाळी लग्न आटोपल्यानंतर राम अवतार आणि जतीन हे दोघेही नववधूंसोबत ऑटोमधून घरी जात होते. दरम्यान, वाटेत पूर्वांचल द्रुतगती मार्गावरील खादरामपूरजवळ बाईकवर आलेल्या काही जणांनी ऑटो थांबवून दोन्ही वरांना लाठ्या-काठ्यांचा धाक दाखवून त्यांच्याकडील सुमारे 60 हजार रुपये रोख व चार मोबाईल लंपास केले. दोन नववधूंनीही पैसे चोरले आणि पळून गेल्या.

रामावतार आणि जतीन यांनी त्यानंतर संपूर्ण घटनेची माहिती ताहारपूर पोलिसांना दिली. त्यानंतर अहरौला येथे घडलेल्या घटनेमुळे तेहबरपूरच्या सेमरी पोलीस चौकीचे प्रभारी उमाकांत शुक्ला यांनी या संपूर्ण घटनेवर कारवाई करत प्रकरण अहरौला पोलिसांच्या ताब्यात दिले. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास अहरौला पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: robber brides of azamgarh married youths of haryana absconded with rs 60000 and 4 mobiles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.