टोळीचा म्होरक्या अखेर ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 12:31 AM2019-08-27T00:31:51+5:302019-08-27T00:32:10+5:30
वृद्धांना करत होते टार्गेट : अडीच लाखांचा ऐवज हस्तगत
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : वृद्धांसह महिलांना भूलथापा देत विश्वास संपादन करून हातचलाखीने त्यांच्याजवळील दागिने, मोबाइलसह रोकड लंपास करणाऱ्या टोळीचा म्होरक्या दत्ता काळे (४२, रा. नवी मुंबई) याला महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली आहे. दत्ताचे साथीदार राहुल पवार (२५, रा. परभणी) आणि कन्हैय्या काळे (३०, रा. परभणी) हे दोघे आधीच तुरुंगात आहेत.
रस्त्याने चालत जाणाºया महिलांना तसेच वृद्ध नागरिकांना भूलथापा देऊन त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याजवळील दागिने लंपास करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलिसांनी या टोळीचा शोध सुरू केला होता.
सीसीटीव्हीच्या आधारे राहुल आणि कन्हैय्या या दोघांना महात्मा फुले चौक पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यानंतर या टोळीचा म्होरक्या दत्तालादेखील पोलिसांनी अटक केली आहे.
विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल
च्दत्ता चोरीचे दागिने, पैसे आणायचा आणि मिळालेले पैसे वाटून घ्यायचा. या तिघांकडून पोलिसांनी दोन लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोकड हस्तगत केली आहे.
च्राहुल ऊर्फ बाबू रमेश पवारविरोधात एमएफसी, मुलुंड, कोनगाव पोलीस ठाण्यात मिळून आठ गुन्हे तर कन्हैय्याविरोधात एमएफसी, कोनगाव, वर्तकनगर, पायधुनी आणि कुर्ला पोलीस ठाण्यात ११ गुन्हे, तर दत्ताविरोधात एमएफसी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.