भाईंदरमध्ये लुटारूंची दिवाळी; महिलेच्या गळ्यातील गंठण लुटले 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 04:50 PM2021-11-05T16:50:53+5:302021-11-05T16:52:04+5:30

एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे १ लाख ९० हजारांचे गंठण बळजबरी खेचून दोघे लुटारू पळून गेल्याची घटना घडली आहे. 

robbers the knot in the women neck was looted at bhayandar | भाईंदरमध्ये लुटारूंची दिवाळी; महिलेच्या गळ्यातील गंठण लुटले 

भाईंदरमध्ये लुटारूंची दिवाळी; महिलेच्या गळ्यातील गंठण लुटले 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - कोरोनाचे संकट आणि महागाई मुळे आधीच सर्वसामान्य नागरिक दिवाळी कशीबशी साजरी करत असताना भाईंदरमध्ये एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे १ लाख ९० हजारांचे गंठण बळजबरी खेचून दोघे लुटारू पळून गेल्याची घटना घडली आहे. 

सण असल्याने रश्मी अभय कासवकर ह्या गुरुवारी रात्री ८ . ३०  च्या सुमारास पतीसह मिठाई खरेदी करून गीता नगर मध्ये राहणाऱ्या सासू - सासऱ्यांच्या घरी ९० फुटी मार्गावरून पायी चालत जात होते . त्यावेळी मागून दुचाकी वरून आलेल्या दोघां पैकी मागे बसलेल्या इसमाने रश्मी यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण खेचून पळून गेले . 

या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात रश्मी यांच्या फिर्यादीवरून त्यांच्या गळ्यातील डोण्याचे ६ तोळे वजनाचे १ लाख ९० हजारांचे गंठण लुटून नेल्या बद्दल दोघा अनोळखी दुचाकीस्वारां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ऐन सणासुदीच्या दिवसात लुटारू मोकाट फिरून लूटमार करत असल्याने नागरिकां मध्ये भीतीचे वातावरण आहे .
 

Web Title: robbers the knot in the women neck was looted at bhayandar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.