एकाच रात्रीत चोरट्यांनी फोडली १२ दुकाने , कर्जत, नेरळ परिसरात धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 02:18 AM2019-05-09T02:18:25+5:302019-05-09T02:19:35+5:30

नेरळ शहरात दोन दिवसांपूर्वी तीन दुकाने फोडल्याची घटना ताजी असताना पुन्हा कर्जत शहरात मंगळवारी रात्री पाच ठिकाणी आणि नेरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील साई मंदिर परिसरात पाच, पोशिर येथे एक तर डिकसळ येथे एक मेडिकल अशी सुमारे १२ दुकाने फोडल्याची घटना घडली आहे.

robbery in 12 shops in Karjat, Neral | एकाच रात्रीत चोरट्यांनी फोडली १२ दुकाने , कर्जत, नेरळ परिसरात धुमाकूळ

एकाच रात्रीत चोरट्यांनी फोडली १२ दुकाने , कर्जत, नेरळ परिसरात धुमाकूळ

googlenewsNext

नेरळ - नेरळ शहरात दोन दिवसांपूर्वी तीन दुकाने फोडल्याची घटना ताजी असताना पुन्हा कर्जत शहरात मंगळवारी रात्री पाच ठिकाणी आणि नेरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील साई मंदिर परिसरात पाच, पोशिर येथे एक तर डिकसळ येथे एक मेडिकल अशी सुमारे १२ दुकाने फोडल्याची घटना घडली आहे. या दुकानांमधून हजारो रुपयांचा माल लंपास करण्यात आला आहे. यासंदर्भात दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत कर्जत आणि नेरळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरांनी पोलिसांना एक प्रकारे आव्हान दिले आहे.

नेरळ साईमंदिर परिसरात साई इलेक्ट्रॉनिक्स, मोबाइल रिचार्ज दुकान, स्टेशनरी, कपड्याचे दुकान, पोशीर बस स्टॉपवरील किराणा दुकान, डिकसळ येथील मेडिकल, तर कर्जत शहरातील चारफाटा येथील एक दुकान,तसेच कर्जत स्वप्ननगरीमधील दोन दुकाने, कर्जतमधील एक मेडिकल दुकान,विशेष म्हणजे कर्जत पोलीस ठाण्या समोरीलच कपड्याचे दुकान फोडून चोरट्यांनी काही कपडे लांबविले. अशा एकूण १२ दुकानांतून हजारो रुपयांची रक्कम, तसेच माल लंपास केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री २ च्या सुमारास ही घटना घडली आहे.

काही ठिकाणी चोरटे सीसीटीव्हीमध्ये तीन बाइक घेऊन चोरी करताना दिसून आले आहेत. एकूणच नेरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत आणि नेरळ शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पोलीस या चोरांचा कशा प्रकारे शोध घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन दिवसांतून दुकाने फोडण्याचे प्रकार सुरू असल्याने दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नेरळ आणि कर्जत शहरात वाढलेल्या नागरीकरणामुळे मोठी वस्ती या भागात आहे. त्यामुळे शहरातील मुख्य ठिकाणी लाइट्स तसेच पोलीस चौकी उभारण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांकडून करण्यात येत आहे, चोरीचे प्रकार वारंवार घडत असल्याने आणि पोलीस चौकी उभारली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

चोरांची शक्कल
चोरटे पहिल्यांदा दुकानासमोरून बाइक घेऊन फेºया मारतात आणि काही वेळात येऊन ज्या दुकानासमोर सीसीटीव्ही आहे तो, वाकवून अथवा तोडून चोरी करण्यास सुरुवात करतात अशा अनेक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या आहेत. म्हणजे चोरांची हुशारी पोलिसांना चकवा देणारी ठरत आहे.

नेरळमधील मुख्य भागात पोलीस चौकीची गरज
नेरळ शहरात आणि डिकसळ भागात पोलीस चौकी उभारण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. यासाठी उपोषणेदेखील झाली आहेत; परंतु पोलीस चौकी उभारण्यास कोणीही पुढाकार घेत नाही. याचाच फायदा चोरटे घेत आहेत.

सीसीटीव्ही लावण्याची मागणी
नेरळ शहरात अनेक भागात पथदिवे(लाइट्स) नसल्याने चोरटे याचाच फायदा घेऊन चोरी करत असल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे ग्रामपंचायतीमार्फत मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही तसेच लाइट्स लावण्याची मागणी होत आहे.

नेरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत आठवडाभरात ७ ते ८ ठिकाणी चोरी झाली आहे. या संदर्भात आमचा तपास सुरू आहे. लवकरच चोरांच्या मुसक्या आवळल्या जातील.
- सोमनाथ जाधव, सहायक पोलीस निरीक्षक, नेरळ

Web Title: robbery in 12 shops in Karjat, Neral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.