नवरी जोमात, नवरदेव कोमात! लग्नानंतर पैसे घेऊन नववधू व्हायची पसार, 'असा' झाला पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 07:38 PM2022-12-30T19:38:38+5:302022-12-30T19:39:20+5:30
लग्नानंतर अवघ्या काही दिवसांत दागिने आणि पैसे घेऊन नवरी पळून गेल्याने सासरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.
देशात फसवणुकीच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर सासरी आलेल्या नवरीने नवरदेवालाच गंडा घातल्याची घटना घडली आहे. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांत दागिने आणि पैसे घेऊन नवरी पळून गेल्याने सासरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. पण अशाच एका टोळीचा रामपूर जिल्ह्यातील पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
रामपूर पोलिसांनी लुटेरी दुल्हनच्या टोळीला अटक केली आहे. रामपूर पोलिसांनी लग्नाच्या नावाखाली लुटणाऱ्या खोट्या वधूसह आठ आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटकही केली आहे. रामपूरचे पोलीस अधीक्षक अशोक कुमार शुक्ला यांनी रामपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन या टोळीचा पर्दाफाश केल्याचं सांगितलं आहे.
पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की, ही टोळी एका मुलीचे वधू म्हणून लग्न लावून द्यायचे. त्यानंतर वर आणि त्याच्या कुटुंबीयांना ब्लॅकमेल करायचे. वर पक्षाचे संपूर्ण घर लुटायचे. रामपूरचे पोलीस अधीक्षक अशोक कुमार शुक्ला यांनी सांगितले की, या टोळीने अनेक कुटुंबांची फसवणूक केली आहे. आरोपींना रिमांडवर घेऊन अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला जाईल, असंही त्यांनी सांगितलं. रामपूर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
पोलीस अधीक्षक अशोक कुमार शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील किथोर पोलीस स्टेशन हद्दीतील हसनपूर गावातील रहिवासी सार्थक शर्मा आणि त्याचा मेहुणा आकाश स्वामी यांची उत्तराखंड येथील रुद्रपूरच्या लेक पार्कमध्ये एका मुलीची भेट घडवून आणली. त्यानंतर त्यांचं बनावट लग्न लावून देण्यात आलं. नंतर त्यांची 92 हजारांची फसवणूक करून त्यांना मारहाणही करण्यात आल्याचा आरोप आहे. सार्थक शर्माने याप्रकरणी गंज पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"