गावात दरोडा; महिलेच्या गळ्यावर सुरा ठेवत अंगावरील दागिने लुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 10:04 PM2022-03-02T22:04:53+5:302022-03-02T22:29:21+5:30

खोणी गावातील वकील अजय विष्णू पाटील यांच्या घरावर दरोडेखोरांनी दरोडा टाकला आहे

Robbery in the village of bhiwandi; The woman was robbed of her jewelery while keeping a security around her neck | गावात दरोडा; महिलेच्या गळ्यावर सुरा ठेवत अंगावरील दागिने लुटले

गावात दरोडा; महिलेच्या गळ्यावर सुरा ठेवत अंगावरील दागिने लुटले

Next

भिवंडी : ( दि. २ ) शहरालगत असलेल्या खोणी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका घरावर सशस्त्र पाच दरोडेखोरांनी दरोडा टाकला असल्याची खळबळजनक घटना बुधवारी घडली आहे. चोरट्यांनी खोलीत झोपलेल्या वयस्क महिलेच्या गळ्यावर सूरा ठेवत तिच्या अंगावरील दागिने खेचून चोरटे पळून गेले आहेत. मात्र सिसिटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले असून पोलीस या दरोडेखोरांचा तपास करीत आहेत. 
          
खोणी गावातील वकील अजय विष्णू पाटील यांच्या घरावर दरोडेखोरांनी दरोडा टाकला आहे. रात्री अजय हे पत्नी व मुला सह एका खोलीत तर त्यांची आई नंदाबाई व सहा वर्षांची मुलगी ही दुसऱ्या खोलीत झोपले होते. रात्री तीन वाजताच्या सुमारास आलेल्या पाच दरोडेखोरांनी प्रथम अजय पाटील यांच्या कार्यालयाची कडी कोयंडा तोडून कार्यालयात प्रवेश केला परंतु तेथे काही मिळून न आल्याने दरोडेखोरांनी आपला मोर्चा पहिल्या मजला वरील घराकडे वळवला. तेथील दरवाजाची आतील कडी कशाच्या तरी मदतीने उचकटून आई नंदाबाई झोपलेल्या खोलीत ते शिरले व त्यांच्या गळ्यावर सुरा ठेवत कानातील कर्णफुले खेचून काढली त्यामुळे कानाच्या पाळ्या मधून रक्त वाहू लागले. गळ्यातील गंठन व हातातील बांगड्या हिसकावून घेत असताना महिलेला मला मारू नका तुम्हाला काय न्यायचे ते न्या अशी आर्जव नंदाबाई यांनी केली .त्याच वेळी त्यांची सून उठल्याने व तिने घरात काही व्यक्ती आल्याचे पाहून जोरजोरात आरडाओरड केल्याने परीसरातील नागरीक जागे झाल्याने दरोडेखोरांनी पलायन केले. 
          
दरम्यान परिसरातील युवकांनी दरोडेखोरांचा पाठलाग केला असता दरोडेखोराने त्यांच्या सोबत रस्सी मध्ये बांधून आणलेले दगड ग्रामस्थांवर भिरकावीत पलायन केले .भयभीत कुटुंबीयांनी स्थानिक नागरिक अरुण पाटील यांच्यासोबत निजामपुरा पोलिसांना घटनेची माहिती दिली असता रात्र गस्त करीत असलेले दोन पोलीस काही वेळाने पाहणी करून सकाळी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येण्याचा सल्ला देत निघून गेले .या मुळे अजय पाटील, अरुण पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे . या दरोड्या मध्ये महिलेच्या अंगावरील किमान नऊ तोळे सोने चोरट्यांनी चोरून नेले असून निजामपुरा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: Robbery in the village of bhiwandi; The woman was robbed of her jewelery while keeping a security around her neck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.