नांदेड-पनवेल रेल्वेत लुटमार, प्रवाशांचे दागिने पळविले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 12:47 AM2019-05-11T00:47:03+5:302019-05-11T00:48:16+5:30

येडशी रेल्वस्थानकाच्या होम सिग्नलजवळ नांदेड-पनवेल ही रेल्वे थांबली असता अज्ञात चोरट्यांनी खिडकीतुन हात घालून प्रवाशांचे दागिने व इतर सामान असा सुमारे तीन लाखांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना ९ मे च्या रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली.

Robbery in Nanded-Panvel railway | नांदेड-पनवेल रेल्वेत लुटमार, प्रवाशांचे दागिने पळविले

नांदेड-पनवेल रेल्वेत लुटमार, प्रवाशांचे दागिने पळविले

googlenewsNext

सोलापूर - येडशी रेल्वस्थानकाच्या होम सिग्नलजवळ नांदेड-पनवेल ही रेल्वे थांबली असता अज्ञात चोरट्यांनी खिडकीतुन हात घालुन प्रवाशांचे दागिने व इतर सामान असा सुमारे तीन लाखांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना ९ मे च्या रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली.

ही रेल्वेगाडी येडशी रेल्वे स्थानकाजवळ थांबली असता, अज्ञात चोरट्यांनी खिडकीतुन हात घालुन हा प्रकार केला. 
सरिता जगन्नाथ जोशी (वारजे नाका, कर्वे नगर, पुणे) या कुटुंबियांसह कोच क्रमांक सातच्या बर्थ क्रमांक १२ व १३ वरुन प्रवास करत होत्या. त्यांच्या गळ्यातील ३० ग्रॅम वजनाचे ९५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसुत्र, पाचशे रुपयांची पर्स व रोख साडेपाच हजार रुपये असा एक लाख एक हजार रुपयांचा ऐवज हिसकावुन नेला. सहप्रवासी नम्रता मनिष भाटीया (रा.पिंपरी, पुणे) यांचा ३० हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल, ११ हजार ५०० रुपये किमतीचा एमआय कंपनीचा मोबाईल, १२ हजार रुपयांचा ओप्पो कंपनीचा मोबाईल, रोख २० हजार रुपये व पाचशे रुपयांची पर्स असा ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला. गिरीजाबाई रोहिदास मुंजाळ (रा बहिरजी नगर वसमत, जि हिंगोली) यांच्या गळ्यातील ३० हजार रुपयांचे मंगळसुत्र चोरीस गेले.  मंजुषा विठ्ठलराव होणशेटवाड (रा जानकीनगर, नांदेड) यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी हिसकावुन नेले. रेश्मा गोकुळसिंग राठोड (रा पाचुदा, जि. नांदेड) यांच्या गळ्यातील १५ हजार रुपये किमतीचे दोन वाट्यांचे सोन्याचे मणी मंगळसुत्र चोरट्यांनी ओढुन नेले. प्रमिला सुर्यकांत चिद्रवार (रा श्रीरामनगर, परभणी) यांच्या गळ्यातील १५हजार रुपयांचे  मणीमंगळसुत्र चोरट्यांनी हिसकावुन नेले. सरिता जगन्नाथ जोशी( रा पुणे) यांच्या फियार्दीवरुन कुडुर्वाडी रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Robbery in Nanded-Panvel railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.