सोसायटीवर दरोडा, आरोपीला पायावर गोळी झाडून सिनेस्टाईल अटक
By शिवराज बिचेवार | Published: October 2, 2022 11:44 AM2022-10-02T11:44:21+5:302022-10-02T12:09:16+5:30
उमरी तालुक्यातील सिंधी येथे काँग्रेसचे पदाधिकारी मारोतराव कवळे यांच्या क्रेडिट सोसायटीवर शनिवारी दुपारी दरोडा घालण्यात आला होता
नांदेड.- रविवारी पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास मुदखेड तालुक्यातील वांगी शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका आरोपीच्या पायावर गोळी झाडून त्याला पकडले. बालाजी महाशेट्टे असे आरोपीचे नाव असून शनिवारी क्रेडिट सोसायटीवर घातलेल्या दरोड्यात त्याचा सहभाग होता. पोलिसांनी त्याच्याकडून लुटीतील दोन लाख रुपये जप्त केले.
उमरी तालुक्यातील सिंधी येथे काँग्रेसचे पदाधिकारी मारोतराव कवळे यांच्या क्रेडिट सोसायटीवर
शनिवारी दुपारी दरोडा घालण्यात आला होता. हातात तलवारी घेऊन सहा जण सोसायटीत घुसले होते. यावेळी त्यांनी संगणक तोडफोड केली तसेच कर्मचाऱ्यांना मारहाण करून 2 लाख 4 हजार रुपये लंपास केले होते. पळून जाताना मात्र त्यातील मंजितसिह सिरपल्लीवाले हा दरोडेखोर दुचाकी वरून पडल्याने नागरिकांच्या हाती लागला होता. यावेळी नागरिकांनी त्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या दरोडेखोरांच्या मागावर होते. रविवारी पहाटे मुदखेड तालुक्यातील वांगी शिवारात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक गस्त घालत होते. यावेळी त्यांनी एका संशयित दुचाकीस्वराला अडविण्याचा प्रयत्न केला असताना त्याने पोलिसांवर हल्ला केला. प्रत्त्युत्तरात पोलिसांनी त्याच्या पायावर गोळी झाडून पकडले. बालाजी महाशेट्टे असे आरोपीचे नाव असून दरोड्यात त्याचा सहभाग होता. त्याच्याकडून दरोड्यातील रक्कम जप्त करून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणात आणखी चार आरोपींचा शोध सुरू आहे.
असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक संशयित दुचाकी अडविण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांच्यावर हल्ला केला, यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपी जखमी झाला. या आरोपीचा दरोड्यात समावेश होता. पोलिसांनी त्याच्याकडून लुटीतील दोन लाख रुपये जप्त केले असून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणात आणखी चार आरोपींचा शोध सुरू आहे.