मार्केटयार्ड परिसरात भरदिवसा रॉडने हल्ला करून व्यापार्याच्या दिवाणजीला लुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 12:09 PM2020-07-30T12:09:06+5:302020-07-30T12:09:48+5:30
साडे तीन लाखांची रक्कम जबरी चोरी
पुणे : व्यापारातून आलेली रक्कम बँकेत भरण्यासाठी निघालेल्या कर्मचार्याला रस्त्यात गाठून त्यावर रॉडने हल्ला करून त्याच्याजवळील ३ लाख ३० हजारांची रक्कम चोरट्यांनी जबरी चोरून केल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मार्केटयार्ड परिसरात घडली.
याबाबत तेलाचे व्यापार्याकडे दिवाणी म्हणून नोकरीस असलेल्या सुमंतीलाल चंदनलाल ओस्तवाल (वय ६९, रा. गंगानगर, आकुर्डी प्राधिकरण) यांनी याबाबत मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी दुचाकीवर आलेल्या तिघांवर मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायकुमार नहार हे तेलाचे व्यापारी असून त्यांचा मार्केटयार्डात गाळा आहे. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ओस्तवाल हे त्यांच्या मालकाच्या व्यापाराची जमा झालेली 3 लाख 30 हजार रूपयांची रक्कम भरण्यासाठी दुचाकीवरून जवळच असलेल्या पुणे पीपल्स बँक येथे भरण्यासाठी घेऊन जात होते. त्यांनी पैशाची बँक त्यांच्या दुचाकीला मागील बाजूस अडकवली होती. ओस्तवाल हे दुचाकीवर बाहेर पडल्यानंतर काही मिनीटातच त्यांच्या दुचाकीला तिघांनी त्यांची दुचाकी आडवी घातली. त्यांना तुम्हाला दुचाकी चालवता येत नाही का ? म्हणत त्यांच्याशी हुज्जत घातली. याच दरम्यान त्यातील एकाने दुचाकीच्या हुकाला अडकवलेली पैशाची बॅग हिसकाऊन घेतली. ओस्तवाल यांनी त्या चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यातील एकाने त्याच्या हातातील रॉड त्यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. व बॅग जबरी चोरी करून नेली. सध्या गुन्ह्याचा तपास सुरू असून आरोपींच्या शोधासाठी तपासपथके कामाला लागली आहेत. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक जी. जी. खरात करत आहेत.