इंदापूर येथे किरकोळ कारणावरुन चौतीस वर्षीय इसमाच्या डोक्यात घातला गज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 08:09 PM2019-03-22T20:09:12+5:302019-03-22T20:12:04+5:30
जर पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर तुमच्या विरोधात आम्ही अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करू अशा आशयाची धमकी दिली.
इंदापूर : जुन्या भांडणाचा राग मनात धरून लोखंडी गजाने मारहाण करून चौतीस वर्षीय इसमास जखमी केल्याची घटना इंदापूर तालुक्यातील बावडा येथे गुरुवारी (दि. २१ ) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या संदर्भात अब्दुल दस्तगीर सय्यद ( वय ३४ ) रा. खंडोबानगर, बावडा ता. इंदापूर जि. पुणे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर गुन्ह्यामध्ये अमोल उत्तम मोहिते व सागर उत्तम मोहिते दोघेही रा. खंडोबानगर बावडा ता. इंदापूर जि. पुणे अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल दस्तीगीर सय्यद याची पत्नी व आई यांच्यामध्ये किरकोळ भांडणे सुरू असताना,अमोल मोहिते व सागर मोहिते त्या ठिकाणी आले त्यावेळी फिर्यादी आरोपीस म्हणाले, आमचे घरगुती भांडणे असल्याने तुम्ही येथे थांबू नका, मात्र आरोपीने जुन्या भांडणाचा राग मनात धरून, हातात लोखंडी गज घेवून आले व फियार्दी यांच्या डाव्या हाताच्या पंज्यावर मारला व अमोल मोहिते याने खून करण्याच्या उद्देशाने डोक्यात गज मारला, यामुळे फिर्यादींच्या डोक्याला दुखापत झाली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला धमकी दिली की, जर पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर तुमच्या विरोधात आम्ही अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करू, अशा आशयाची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.