राेहा बलात्कार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात, विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 06:41 PM2020-08-24T18:41:40+5:302020-08-24T18:46:23+5:30
गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
रायगड - रोहा तालुक्यातील तांबडी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तीची हत्या करण्यात आली हाेती. या गुन्ह्याचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल, तसेच या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
26 जुलै रोजी तांबडी येथील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची बलात्कार करुन हत्या करण्यात आली होती. गृहमंत्री देशमुख यांनी साेमवारी (24 ऑगस्ट) या घटनेतील पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर रोहा शहरातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. तांबडी येथील घटना ही दुर्दैवी आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण करुन, लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल. त्याचप्रमाणे हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड.उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी मराठा क्रांती मोर्चासह विविध संघटनांनी भेट घेतली हाेती. त्यांनी याबाबतची मागणी केल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
विशेष सरकारी वकील अॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याने पिडीतेला न्याय मिळणार असल्याचा विश्र्वास पिडीतेच्या कुटूंबाकडून व्यक्त करण्यात येत आहे. याप्रसंगी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर उपस्थित होते.
अन्य महत्वाच्या बातम्या...
पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल
चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?
सीबीआय तपासाची चक्रं जोरात फिरली, टीम सुशांत राजपूतच्या घरी या व्यक्तींसोबत पोहोचली!