खोली क्रमांक २०१... पिता-पुत्राला आधी बेशुद्ध केले नंतर गळा दाबून हत्या, दुहेरी हत्याकांडाने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 01:32 PM2022-07-11T13:32:15+5:302022-07-11T13:32:59+5:30

Double Murder Case : हजारीबाग येथील इचक येथील नागेश्वर मेहता आणि त्यांचा मुलगा अशी मृतांची नावे आहेत.

Room No. 201 ... Father and son first made unconscious, then strangled to death, double murder | खोली क्रमांक २०१... पिता-पुत्राला आधी बेशुद्ध केले नंतर गळा दाबून हत्या, दुहेरी हत्याकांडाने खळबळ

खोली क्रमांक २०१... पिता-पुत्राला आधी बेशुद्ध केले नंतर गळा दाबून हत्या, दुहेरी हत्याकांडाने खळबळ

Next

झारखंडच्या रांचीमधून दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे शिवालिक नावाच्या हॉटेलमधील खोली क्रमांक २०१ मध्ये पिता-पुत्राचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हजारीबाग येथील इचक येथील नागेश्वर मेहता आणि त्यांचा मुलगा अशी मृतांची नावे आहेत.

घटनेपूर्वी दोन्ही मृतांना अंमली पदार्थ पाजण्यात आल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे दोघेही बेशुद्ध झाले, त्यानंतर चाकूने गळा चिरून त्यांची हत्या करण्यात आली. माहिती मिळताच रांचीचे सिटी एसपी, सिटी डीएसपी, कोतवाली डीएसपी यांच्यासह पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. पाहणी केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले असून ते तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे काम करत आहेत.

सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत एक अज्ञात व्यक्ती पिता-पुत्राच्या खोलीत जाताना दिसली. त्यामुळे त्याने दोघांचा गळा चिरून खून केला असावा, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मृतकासोबत त्याचा जावई देखील होता, त्यामुळे पोलीस त्याच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी इतर नातेवाईकांनाही कळवण्यात आले आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Web Title: Room No. 201 ... Father and son first made unconscious, then strangled to death, double murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.