स्नॅपडील लकी ड्रॉची बतावणी करून पावणेदोन लाख हडपले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2020 08:01 PM2020-09-26T20:01:23+5:302020-09-26T20:03:30+5:30
सायबर गुन्हेगाराचा गंडा : सदर ठाण्यात गुन्हा दाखल
नागपूर : स्नॅपडीलच्या लकी ड्रॉ मध्ये १७ लाख रुपयाच्या कारचे पाहिले बक्षीस लागल्याची थाप मारून सायबर गुन्हेगाराने एका व्यक्तीला एक लाख ८५ हजार रुपयांचा गंडा घातला. १८ सप्टेंबरला घडलेल्या या बनवाबनवीची तक्रार मिळाल्यानंतर सदर पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला.
सदर परिसरात राहणाऱ्या पीडित व्यक्तीला १८ सप्टेंबरच्या सकाळी १० वाजता एक फोन आला. फोन करणाऱ्याने आपले नाव संजय गुप्ता सांगितले. तुम्हाला स्नॅपडीलच्या लकी ड्रॉमध्ये १६ लाख ९४ हजार रुपये किमतीची आलिशान कार पहिला पुरस्कार म्हणून मिळाली आहे, अशी बतावणी कथित आरोपी गुप्ताने केली.
हा पुरस्कार पाहिजे असेल तर तुम्हाला प्रोसेसिंग फी म्हणून ६५०० रुपये भरावे लागेल, असे सांगून पीडित व्यक्तीच्या मोबाईलवर एक लिंक पाठवली. फिर्यादीने ती लिंक उघडून संबंधित अकाउंट मध्ये ६५०० रुपये भरले. त्यानंतर आरोपी वारंवार फोन करुन वेगवेगळे कारण सांगून फिर्यादीला रक्कम भरायला सांगू लागला. एकूण एक लाख ८४५८० रुपये भरल्यानंतरही आरोपीचे पैसे मागणे सुरूच होते. त्यामुळे फिर्यादीला संशय आला. पुरस्काराची कार नको, आपली रक्कम परत द्या, असे म्हटले असता आरोपीने त्यांच्याशी संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यामुळे पीडित व्यक्तीने सदर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
पूनम पांडे विनयभंग प्रकरण : सॅम बॉम्बे सध्या झिजवतोय पोलीस ठाण्याचे उंबरठे
Sushant Singh Rajput Case : आता तर अभिनेत्रींची नावं समोर आलीत; अभिनेते अजून बाकी आहेत! ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया
एनसीबी कार्यालयासमोर न्यूज चॅनल्सचे रिपोर्टर्स भिडले, पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप
बॉलिवूडमधल्या ड्रग्ज कनेक्शनची पाळंमुळं खणून काढतोय डॅशिंग मराठी अधिकारी... चला भेटूया!
धारदार शस्त्राने हल्ला करून एका तरुणाची अज्ञाताने केली हत्या
विदेशी फेसबुक फ्रेंडने फसविले, गिफ्ट पाठविण्याची केली बतावणी
दीपिका - करिष्माची समोरासमोर झाडाझडती, सारा, श्रद्धा देखील एनसीबी चौकशीसाठी पोहचल्या
दीपिकाची तीन-चार राउंडमध्ये होणार चौकशी, एनसीबीने जप्त केला फोन
NCB ने कारवाईचा फास आवळला, धर्मा प्रॉडक्शनच्या माजी निर्माता क्षितिज प्रसादला अटक