२५ कोटी रुपयांचा गुंतवणूकदाराला चुना; बांधकाम कंपनी व संचालकांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 09:18 AM2022-12-18T09:18:38+5:302022-12-18T09:18:49+5:30

मे. झीअस हाउसिंग अँड कन्स्ट्रक्शन लिमिटेड कंपनी आणि त्याच्या संचालकांवर शनिवारी सायन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू आहे. 

Rs. 25 crore to investors; Crime against construction company and directors | २५ कोटी रुपयांचा गुंतवणूकदाराला चुना; बांधकाम कंपनी व संचालकांवर गुन्हा

२५ कोटी रुपयांचा गुंतवणूकदाराला चुना; बांधकाम कंपनी व संचालकांवर गुन्हा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बांधकाम व्यावसायिकाला चार वर्षे व्यावसायिक गुंतवणूक करण्यास सांगत २५ कोटी १९ लाख रुपयांचा चुना लावला. याप्रकरणी त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेत धाव घेतली. त्यानुसार मे. झीअस हाउसिंग अँड कन्स्ट्रक्शन लिमिटेड कंपनी आणि त्याच्या संचालकांवर शनिवारी सायन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू आहे. 

या प्रकरणातील फिर्यादी अतुल पटेल (५४) हे बांधकाम व्यावसायिक आहेत. मे. झीअस हाउसिंग अँड कन्स्ट्रक्शनचे संचालक आशित दोशी आणि मनीष शहा यांनी सायन कोळीवाडा येथील एका प्लॉटवर विक्री करायच्या एकूण क्षेत्रापैकी  कमी क्षेत्र विक्री केले आहे. त्यानुसार त्यामधील २० टक्के बांधकाम क्षेत्र पटेल यांना देऊ असे आमिष दाखविले. त्यानंतर पटेल यांनी त्यांच्या कंपनीत गुंतवणूक केली. मात्र बांधकामाच्या क्षेत्राची निश्चिती होण्याआधीच पटेलांच्या संमतीशिवाय सेलेबल इमारतीमधील सदनिकांची आरोपींनी विक्री केली.

गहाण ठेवलेल्या फ्लॅटची परस्पर विक्री
पटेल यांचे सोने त्यांनी परत केले नाही. उलट त्या बदल्यात जे फ्लॅट त्यांनी गहाण ठेवले होते. त्याचीही महेंद्र शहा नामक व्यक्तीला पटेल यांच्या संमतीशिवाय परस्पर विक्री केली. 
हा प्रकार २०१६ ते २०१९ दरम्यान घडला असून त्यांची आरोपींनी २५ कोटी १९ लाख ८० हजार ७२६ रुपयांची फसवणूक केली आहे. त्यानुसार याप्रकरणी सायन पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान संहिता कलम ४०९, ४२० आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

जो आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून आर्थिक गुन्हे विभाग १ चे पोलिस उपायुक्त संग्रामसिंग निशाणदार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय काटे, सहायक पोलिस निरीक्षक संजय पाटील आणि पथकाकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Web Title: Rs. 25 crore to investors; Crime against construction company and directors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.