पनवेलमध्ये ५० लाख रुपयांचा गुटखा जप्त, गुन्हे शाखेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 02:19 AM2020-01-23T02:19:06+5:302020-01-23T02:19:46+5:30
गुन्हे शाखा कक्ष दोनच्या पथकाने कामोठेमध्ये गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडला. तब्बल ५० लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून चालकाला ताब्यात घेतले आहे.
पनवेल : गुन्हे शाखा कक्ष दोनच्या पथकाने कामोठेमध्ये गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो पकडला. तब्बल ५० लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून चालकाला ताब्यात घेतले आहे.
गोवा येथून मुंबई बाजूकडे गुटख्याचे १०० हून अधिक बोचकी आयशर टेम्पोमधून नेली जात असल्याची खबर गुन्हे शाखा कक्ष २ च्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पोपेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप गायकवाड, शरद ढोले, प्रफुल्ल मोरे, संजय पाटील, सुनील कुदळे आदीच्या पथकाने सापळा रचून कामोठे परिसरात आयशर टेम्पो क्र. एमएच-४६-बीएफ-१४१३ अडवला. या टेम्पोतून जवळपास ५० लाखांचा असलेला गुटखा टेम्पोसह हस्तगत केला आहे. याबाबतची माहिती अन्न व औषध प्रशासन विभाग पेण यांना दिली असून, त्यांचेसुद्धा पथक घटनास्थळी दाखल झाले होते.
या प्रकरणी चालकाला ताब्यात घेतले असून, गुटख्याची मोजदाद करून गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. या प्रकरणामध्येकोणाचा समावेश आहे. कोठून गुटखा आणला होता व कोणाला विकला जाणार होता, याचा पोलीस तपास करत आहेत.