₹58 कोटींचे फसवणूक प्रकरण; गोंदियातील सट्टाकिंगकडून 15 कोटी रोख, 5KG सोनं, 200KG चांदी जप्त 

By नरेश रहिले | Published: July 22, 2023 07:41 PM2023-07-22T19:41:02+5:302023-07-22T19:43:48+5:30

आरोपी अंनत नवरतन जैन याच्या घरातून 15 कोटी रूपये रोख रक्कम, 5 किलो सोन्याचे बिस्कीट व 200 किलो चांदची आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे...

rs 58 crore fraud case 15 crore cash, 5KG gold, 200KG silver seized from Sattaking in Gondia | ₹58 कोटींचे फसवणूक प्रकरण; गोंदियातील सट्टाकिंगकडून 15 कोटी रोख, 5KG सोनं, 200KG चांदी जप्त 

₹58 कोटींचे फसवणूक प्रकरण; गोंदियातील सट्टाकिंगकडून 15 कोटी रोख, 5KG सोनं, 200KG चांदी जप्त 

googlenewsNext

गोंदिया: ऑनलाईन गेमच्या माध्यमातून नागपुरातील उद्योग पतीच्या मुलाची गोंदियातील तरुणाने 58 कोटी रुपयाने फसवणूक केली. तो फसवणूक करणारा आरोपी गोंदियातील असल्याने नागपूरपोलिसांनी गोंदिया पोलिसांच्या मदतीने त्याच्या घरावर धाड टाकली. आरोपी अंनत नवरतन जैन याच्या घरातून 15 कोटी रूपये रोख रक्कम, 5 किलो सोन्याचे बिस्कीट व 200 किलो चांदची आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे. हे 22 जुलै रोजी सकाळी 10 वाजतापासून सायंकाळी 7 वाजतापर्यंत केलेल्या चौकशीत पुढे आले. पोलिसांची चौकशी सुरूच होती.

गोंदिया शहराच्या सिव्हील लाईन भागातील काका चौकात जैन यांचे घर आहे. अंनत नवरतन जैन यांचे गोंदिया शहराच्या मुख्य बाजार पेठेत कुर्त्याचे दुकान आहे. त्यांना गोंदियात कुर्तेवाला म्हणून ओळखले जाते. मात्र कुर्ते व्यापाराच्या आड त्यांचा मुलगा अनंत हा ऑनलाईन गेमिंग खेळवित असे. नागपुरातील एका प्रसिद्ध व्यापाऱ्याच्या मुलगा हा ऑनलाईन गेम खेळताना गोंदियातील अंनत जैन यांच्या संपर्कात आला. अनंतने त्याची 2021 ते 2023 या काळात 58 कोटी ४2 लाख रुपयाने फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे त्या नागपूरच्या तरूणाच्या लक्षात आल्याने त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.. नागपूर पोलिसात अनंत जैन याच्या विरोधात तक्रार करताच नागपूर पोलिसांनी गोंदियाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या मदतीने 21 जुलै रोजी धाड घातली. आरोपी अनंत नवरतन जैन याच्या घरातून 15 कोटी रूपये रोख रक्कम, 5 किलो वजनाचे सोन्याचे बिस्कीट व 200 किलो चांदी जप्त केली आहे. कारवाई सुरूच असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
 

Web Title: rs 58 crore fraud case 15 crore cash, 5KG gold, 200KG silver seized from Sattaking in Gondia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.