नोट मोजण्याचं मशीन, १२ क्रेडिट कार्ड, शेकडो फाईल्स अन्...; ईडीला सापडले धक्कादायक पुरावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 14:46 IST2024-12-28T14:45:33+5:302024-12-28T14:46:06+5:30

ईडीने आयटी तज्ज्ञांनाही सोबत आणलं होतं, ज्यांनी येथे ठेवलेल्या लॅपटॉप आणि कॉम्पूटरमधून इलेक्ट्रॉनिक डेटा जप्त केला आहे.

rto constable saurabh sharma after ed raid counting machine dozens of credit cards hundreds of files | नोट मोजण्याचं मशीन, १२ क्रेडिट कार्ड, शेकडो फाईल्स अन्...; ईडीला सापडले धक्कादायक पुरावे

नोट मोजण्याचं मशीन, १२ क्रेडिट कार्ड, शेकडो फाईल्स अन्...; ईडीला सापडले धक्कादायक पुरावे

माजी आरटीओ कॉन्स्टेबल सौरभ शर्माचं नोट मोजण्याचं मशीन सापडलं आहे. सौरभ शर्माचा सहकारी चेतन याच्या घरी आणि कार्यालयात ईडीच्या छापेमारीनंतर अनेक धक्कादायक पुरावे सापडले. चेतन गौरचे १२ क्रेडिट आणि डेबिट कार्ड आणि तुटलेल्या शेल्फमधील शेकडो फाइल्ससह नोट मोजण्याचं मशीन सापडलं आहे. ज्या खोलीत ईडीने झडती घेतली होती त्या खोलीत अनेक पुरावे सापडले आहेत. 

भोपाळमधील अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी माजी आरटीओ कॉन्स्टेबल सौरभ शर्माचा सहकारी चेतन गौर याच्या घरावर १२ तासांपेक्षा जास्त काळ छापा टाकला. या काळात एजन्सीने अनेक महत्त्वाची कागदपत्रं, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि मोठ्या रकमेच्या रोख व्यवहारांशी संबंधित पुरावे जप्त केले आहेत.

ईडीच्या कारवाईनंतर आजतकची टीम चेतन गौरच्या घरी पोहोचली, जिथे सौरभ शर्माशी संबंधित अनेक धक्कादायक पुरावे समोर आले आहेत. यावेळी घरात नोटा मोजण्याचं मशीन आढळून आलं. यावरून येथे पैसे मोजले गेले असतील याचा अंदाज येतो. याशिवाय चेतन गौरच्या नावावर अनेक क्रेडिट आणि डेबिट कार्ड सापडले आहेत. सौरभ आणि चेतन यांच्याशी संबंधित शेकडो फाईल्स सापडल्या.

ईडीने आयटी तज्ज्ञांनाही सोबत आणलं होतं, ज्यांनी येथे ठेवलेल्या लॅपटॉप आणि कॉम्पूटरमधून इलेक्ट्रॉनिक डेटा जप्त केला आहे. यातून पैशांचे व्यवहार आणि इतर संशयास्पद हालचालींबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे. हे घर यापूर्वीही लोकायुक्तांच्या रडारवर होते. लोकायुक्तांनी येथून २३४ किलो चांदी, १.७२ कोटी रुपये रोख आणि एकूण ४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. आता ईडी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
 

Web Title: rto constable saurabh sharma after ed raid counting machine dozens of credit cards hundreds of files

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.