पतीची हत्या करून मृतदेहासोबत ठेवले संबंध, शरीराचे तुकडे उंदरांना खाऊ घातले; पत्नी तरीही मोकाट...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 11:47 AM2021-10-30T11:47:37+5:302021-10-30T11:49:22+5:30
अधिकाऱ्यांनुसार कार्टराईटचा मृतदेह कापून त्याचे काही तुकडे फ्रिजमध्ये ठेवण्यात आले. त्याची बोटं उंदरांना खाऊ घालण्यात आलीत.
रशियातील (Russia) एका महिलेला आपल्या पतीच्या हत्येप्रकरणी (Wife Killed Husband) तुरूंगात पाठवण्यात आलं आहे. महिलेवर आरोप आहे की, आधी तिने विष देऊन पतीची हत्या केली, त्यानंतर मृतदेहासोबत शरीरसंबंध ठेवले. इतकंच नाही तर पतीच्या शरीराचे अनेक तुकडे करणे आणि रक्त पिण्याचाही आरोप आहे. पण कोर्टात सुनावणीनंतर पुरावे नसल्याने महिलेला सोडून दिलं. मात्र, तिच्यावर अजूनही केस सुरू आहे.
'मिरर यूके'च्या रिपोर्टनुसार, सेंट पीटर्सबर्ग येथील ३७ वर्षीय आरोपी महिलेचं नाव मरीना कोखल आहे. मरीनावर पती एंडी कार्टराईटच्या हत्येचा आरोप आहे. एंडी कार्टराईट एक रॅपर होता. एंडीची हत्येत मुख्य संशयित असल्याने मरीनाला सोडून नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे.
गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये एंडी कार्टराईटच्या मृत्यूप्रकरणी मरीनाा कोखलला अटक करण्यात आली होती. ज्यानंतर कोर्टात वकिलांनी तिच्यावर 'आपल्या मृत पतीचं रक्त पिणे आणि त्याच्या मृतदेहासोबत संबंध ठेवणे' याचा आरोप लावला. वकिलांनी दावा केला की, मरीनाने आपल्या ६८ वर्षीय आई एलेना सोबत मिळून रॅपर पतीला विष दिलं. रॅपरचं मृत्यूआधी एक २५ वर्षीय मुलीसोबत अफेअर सुरू होतं.
अधिकाऱ्यांनुसार कार्टराईटचा मृतदेह कापून त्याचे काही तुकडे फ्रिजमध्ये ठेवण्यात आले. त्याची बोटं उंदरांना खाऊ घालण्यात आलीत. फॉरेन्सिक तज्ज्ञांना काहीच पुरावा मिळाला नाही. कारण मृतदेहाचा कोणताच अवयव घरात सापडला नाही. पूर्ण फ्लॅट, भांडी आणि वस्तू चांगल्या प्रकारे धुण्यात आल्या होत्या. काही अवयव तर वॉशिंग मशीनमध्ये टाकून नष्ट केले गेले. मरीनावर सगळे पुरावे नष्ट केल्याचाही आरोप आहे.
पुराव्या अभावी आरोपी महिलेला सोडून दिलं गेलं. कोर्टाने तिला चार वर्षाच्या मुलाला भेटण्याची परवानगी सुद्धा दिली. रशिया मीडिया रिपोर्टनुसार, सोडण्यात आल्यावर मरीना ढसाढसा रडली आणि आपली वकील इरिना स्कर्टूला मिठी मारली. ती कोर्टातून निघताना हसत होती.