भयंकर! जगातील पहिली कोरोना लस तयार करणाऱ्याला का मारलं?; आरोपीने सांगितलं 'सत्य'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 11:33 AM2023-03-06T11:33:42+5:302023-03-06T11:34:18+5:30
रशियन कोविड-19 लस स्पुटनिक व्ही तयार करण्यात योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी एक एंड्री बोटीकोव यांची हत्या करण्यात आली.
कोविड-19 लस स्पुटनिक व्ही तयार करण्यात योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी एक एंड्री बोटीकोव यांची बेल्टने गळा दाबून हत्या करण्यात आली. गुरुवारी (2 मार्च) त्यांच्याच अपार्टमेंटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली. बोटीकोव हे रशियातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ होते आणि त्यांना लसीवरील त्यांच्या कार्याबद्दल पुरस्कारही मिळाला होता. अहवालानुसार, 2020 मध्ये स्पुटनिक व्ही लस विकसित करणाऱ्या 18 शास्त्रज्ञांपैकी बोटीकोव एक होते.
रशियन वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, संशयिताने मॉस्कोच्या खोराशेवो जिल्हा न्यायालयात कोर्टासमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. कोर्टाने 2 मे पर्यंत त्याला ताब्यात ठेवण्याचा निर्णय दिला आहे. वृत्तसंस्था टीएएसएसच्या मते, रशियन कायद्याची अंमलबजावणी करणार्या एजन्सींनी सांगितले की परस्पर भांडणात झालेल्या चर्चेदरम्यान आंद्रे यांची हत्या करण्यात आली. हा गुन्हा आहे.
तपास एजन्सीच्या म्हणण्यानुसार, 2 मार्च रोजी मॉस्कोच्या अपार्टमेंटमध्ये झालेल्या वादविवादात 29 वर्षांचा तरुण अलेक्सी व्लादिमिरोविच झ्मानोव्स्कीने बेल्टने गळा दाबून शास्त्रज्ञाला मारलं. रशियन शास्त्रज्ञाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. त्याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्ह्यात खटला भरण्यात आला असून तो अनेक वर्षांपासून तुरुंगात होता.
रशियन वृत्तसंस्थेने TASS ने रशियन फेडरेशनच्या तपास समितीच्या हवाल्याने म्हटले आहे की, 47 वर्षीय बोटीकोव, गामालेया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर इकोलॉजी अँड मॅथेमॅटिक्समध्ये वरिष्ठ संशोधक म्हणून काम करत होते, गुरुवारी त्यांच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आले. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी कोविड लसीवरील कार्याबद्दल 2021 मध्ये वायरोलॉजिस्टला 'ऑर्डर ऑफ मेरिट फॉर द फादरलँड' पुरस्काराने सन्मानित केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"