खाकीला काळिमा! रशियन महिला बलात्कारप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 05:50 PM2019-10-12T17:50:05+5:302019-10-12T17:59:55+5:30

जाधव हा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक होता.

Russian woman raped: FIR against Police officer | खाकीला काळिमा! रशियन महिला बलात्कारप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

खाकीला काळिमा! रशियन महिला बलात्कारप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस अधिकारी भानुदास ऊर्फ अनिल जाधववर बलात्कारासह अनैसर्गिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.१२ वर्षांत जाधवने मारहाण केली, अनेकदा कैद करून ठेवल्याचेही तिने तक्रारीत नमूद केले आहे.

मुंबई - रशियन महिलेवर बारा वर्षे बलात्कार, अनैसर्गिक अत्याचार करणारा पोलीस अधिकारी भानुदास ऊर्फ अनिल जाधववर बलात्कारासह अनैसर्गिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाधव हा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक होता. गेल्या महिन्यातच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्यावर कारवाई केली. तेव्हा त्याने पोलिसांवर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्याला निलंबित केले होते. रशियन महिलेच्या तक्रारीनुसार, व्हिसा वाढवून देण्यास मदतीच्या बहाण्याने जाधवने तिचा पासपोर्ट घेत जवळीक साधली. २००४ पासून १२ वर्षे तिच्यावर बलात्कार, अनैसर्गिक अत्याचार केले. खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी तो देत असे. काश्मिरी तरुणी दाखवून, फिरोजा खान नावाने त्याने तिला खोटे पुरावे तयार करून दिले. ती विरोधात जाऊ नये म्हणून अली नाव धारण करून धर्म बदलत तिच्यासोबत विवाह केला. विवाहानंतर तिने मुलाला जन्म दिला. मुलाला एका नातेवाईकाकडे ठेवत त्याने तरुणीला पुन्हा रशियात पाठविले. १२ वर्षांत जाधवने मारहाण केली, अनेकदा कैद करून ठेवल्याचेही तिने तक्रारीत नमूद केले आहे.

Web Title: Russian woman raped: FIR against Police officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.