निर्दयी आई बापानं केली स्वत:च्या मुलीची निर्घृण हत्या; कारण ऐकून पोलीस हादरले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 07:52 PM2022-06-08T19:52:59+5:302022-06-08T19:53:29+5:30

या मुलीच्या हत्येमागे घरच्यांच हात असल्याचा संशय पोलिसांना होता. पोलिसांनी मृत मुलीच्या आई वडिलांना बोलावून चौकशी केली.

Ruthless parents brutally kill their own daughter; Because the police were shocked | निर्दयी आई बापानं केली स्वत:च्या मुलीची निर्घृण हत्या; कारण ऐकून पोलीस हादरले

निर्दयी आई बापानं केली स्वत:च्या मुलीची निर्घृण हत्या; कारण ऐकून पोलीस हादरले

Next

उन्नाव - उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे एका अल्पवयीन मुलीच्या हत्येचा उलगडा पोलिसांनी केला असून त्यातून समोर आलेल्या सत्याने पोलीसही हादरले आहेत. अल्पवयीन मुलीच्या वडिलानेच तिची हत्या केली असल्याचं पोलिसांनी सांगितले. शेजारी राहणाऱ्या प्रेयसीच्या भावांना फसवण्यासाठी निर्दयी बापाने स्वत:च्या पोटच्या मुलीचा बळी दिला. बलात्काराच्या आरोपाखाली अडकवण्यासाठी मुलीच्या गुप्तांगाला जखम पोहचवली. इतकेच नाही तर या घटनेत बापाला आईनेही साथ दिली. पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. 

बांगरमऊ कोतवाली परिसरात एका गावात ११ वर्षीय मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सोमवारी सकाळी घरापासून १ किमी दूर रेल्वे स्टेशन परिसरात सापडला. घटनास्थळावर सिमेंटच्या पिलरवर आपटून तिची हत्या करण्यात आली. पोस्टमोर्टमध्ये अल्पवयीन मुलीच्या नाजूक भागालाही जखम केल्याची पुष्टी करण्यात आली. या हत्येसाठी मुलीच्या आईनं शेजारील महिला, तिचा दीर आणि भावांवर बलात्काराचा आरोप करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. 

या घटनेनंतर मंगळवार दुपारी आयजीने बांगरमऊ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. एसपी दिनेश त्रिपाठीने आतापर्यंत झालेल्या तपासणीनंतर आणि पोस्टमोर्टम रिपोर्टच्या आधारे खुलासा केला. या मुलीच्या हत्येमागे घरच्यांच हात असल्याचा संशय पोलिसांना होता. पोलिसांनी मृत मुलीच्या आई वडिलांना बोलावून चौकशी केली. सुरुवातीला पोलीस तपासात दोघंही उडवाउडवीची उत्तर दिले. त्यानंतर पोलिसांनी धाक दाखवताच निर्दयी आई बाप त्यांच्याच जाळ्यात अडकले आणि सत्य उघड केले. 

मृत मुलीचे वडील गावातील एका विधवा महिलेसोबत २० मार्च रोजी बाहेर गेले होते. त्यामुळे या महिलेचे नातेवाईक वडिलांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. जेव्हा वडील आणि ती महिला परत आली तेव्हा नातेवाईकांच्या दबावामुळे महिलेने मुलीच्या वडिलांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणला जात होता. त्यामुळे मुलीचे वडील भयभीत झाले होते. त्यानंतर महिलेच्या नातेवाईकांना फसवण्यासाठी बापाने स्वत:च्या मुलीलाच निशाणा बनवलं. 

मुलीच्या वडिलांनी प्रेयसीला आणि तिच्या कुटुंबीयांना धडा शिकवण्यासाठी वारंवार आजारी असलेल्या मुलीला ढाल बनवले. मुलीच्या वडिलांनी आधी मुलीची हत्या केली, नंतर महिलेच्या कुटुंबीयांना बलात्काराच्या प्रकरणात गोवण्यासाठी मुलीच्या नाजूक भागात जखम केली. एसपी दिनेश त्रिपाठी यांनी सांगितले की, या निर्घृण हत्येमध्ये मृताच्या वडिलांशिवाय तिच्या आईचाही सहभाग आहे. कट रचणाऱ्या दोघांवर कारवाई सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. 

Web Title: Ruthless parents brutally kill their own daughter; Because the police were shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.