Sachin Vaze Arrested : स्फोटकांची कार लावण्यात सचिन वाझेंचा थेट सहभाग; NIAचे गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 09:00 AM2021-03-14T09:00:04+5:302021-03-14T09:12:42+5:30
Sachin Vaze Arrested by NIA: वाझे यांनी अटकेपासून वाचण्यासाठी शुक्रवारीच जिल्हा सत्र न्यायालय ठाणे येथे अंतरीम जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. एनआयएने सांगितल्यानुसार, सचिन वाझे यांना आईपीसीच्या कलम 286, 465, 473, 506(2), 120 बी आणि 4 (ए)(बी)(आय) स्फोटक वस्तू कलम 1908 अंतर्गत अटक करण्यात आली आहे.
प्रसिद्ध उद्योगपती आणि अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार ही पोलीस अधिकारी सचिन वाझेंनीच (Sachin Vaze) ठेवल्याचा संशय एनआयएने व्यक्त केला आहे. शनिवारी रात्री वाझेंना अटक करण्यात आली असून आज कोठडी मिळविण्यासाठी वाझेंना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. (Sachin Vaze Arrest: 'role in placing explosives-laden car' near Mukesh Ambani's house)
वाझे यांनी अटकेपासून वाचण्यासाठी शुक्रवारीच जिल्हा सत्र न्यायालय ठाणे येथे अंतरीम जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. एनआयएने सांगितल्यानुसार, सचिन वाझे यांना आईपीसीच्या कलम 286, 465, 473, 506(2), 120 बी आणि 4 (ए)(बी)(आय) स्फोटक वस्तू कलम 1908 अंतर्गत अटक करण्यात आली आहे.
NIA to present Mumbai police officer Sachin Waze before a court today, demanding his custody. He was arrested late last night in connection with NIA probe into the recovery of explosives from a car parked near Mukesh Ambani's residence in Mumbai.
— ANI (@ANI) March 14, 2021
Visuals from outside NIA office. pic.twitter.com/7Tn61zPQ2k
या कलमांमध्ये वाझेंनी ही कार तिथे लावण्यात महत्वाची भूमिका बजावल्यासंदर्भात कलमाचा समावेश आहे. वाझेंवर फसवणूक, विस्फोटकांशी निष्काळजीपणा बाळगणे, बनावट मोहर बनविणे आणि धमकी देण्याचे आरोप लावण्यात आले आहेत. स्कॉर्पिओ कारचे मालक मनसूख हिरेन हत्या प्रकरणातही वाझेंचे नाव येत आहे. वाझे यांचा अंबानी यांच्या निवासस्थानाशेजारी जिलेटीनने भरलेली कार पार्क करण्याच्या कटात थेट सहभाग होता, असा आरोप एनआयएने लावला आहे. यामुळे मनसूख हिरेन मृत्यू आणि स्फोटकांच्या कारचा थेट संबंध वाझेंशी जोडला जाण्याची शक्यता आहे.
अर्णब यांच्या अटकेसाठी ‘त्या’ स्कार्पिओचा वापर -
साहाय्यक निरीक्षक सचिन वाझे यांच्याकडील चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे. हिरेन यांच्या महिंद्रा स्कॉर्पिओचा वापर सुमारे चार महिन्यांपूर्वी अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवेळी (४ नोव्हेंबर) करण्यात आला होता. २५ फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या असलेली कार सापडली होती. ती तेव्हा वाझे यांच्याकडे होती. याच गाडीतून अर्णब गोस्वामी यांच्या घरी ते गेले होते. मात्र त्या वेळी या स्कॉर्पिओला अन्य नंबर प्लेट लावली होती, असे सूत्रांकडून सांगण्यात येते.