Sachin Vaze : प्रॅडो कारचे गूढ अखेर आलं बाहेर; जिलेटीन कांड्या मुंबईत आणण्यासाठी झाला होता वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 09:41 PM2021-03-19T21:41:40+5:302021-03-19T21:46:07+5:30
Sachin Vaze: लगेच दुसऱ्या दिवशी २६ फेब्रुवारीला वाझे यांनी मनसुख यांना चौकशीसाठी या प्रॅडो कारमधून पोलीस मुख्यालयात आणले होते.
एनआयएने सचिन वाझे हे राहत असलेल्या ठाण्यातील साकेत कॉम्प्लेक्समधून ताब्यात घेतलेल्या प्रॅडो कारचं गूढ अखेर उघड झालं आहे. एनआयएच्या तपासात स्फोटकांची वाहतूक नागपूरहून मुंबईत याच कारने केल्याच्या संशय आहे. त्यामुळे एनआयएने हि प्रॅडो कार ताब्यात घेतली आहे.
स्कॉर्पिओमध्ये स्फोटके ठेवण्याआधी ती स्फोटके प्रॅडो गाडीतून नागपूरहून मुंबईत आणण्यात आली असल्याचा NIA ला संशय आहे. याच प्रॅडो कारमधून मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांनी २६ फेब्रुवारीला एकत्रित प्रवास करून मुंबई पोलीस आयुक्तालय गाठले होते. २५ फेब्रुवारीला उद्यऑप्टी मुकेश अंबानी यांच्या अँटिलीया निवास्थानाबाहेर एक स्कॉर्पिओ कार जिलेटीनच्या कांड्यासह सापडली. नंतर ती स्कॉर्पिओ मनसुख यांच्या ताब्यातील असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी २६ फेब्रुवारीला वाझे यांनी मनसुख यांना चौकशीसाठी या प्रॅडो कारमधून पोलीस मुख्यालयात आणले होते.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाबाहेरील रस्त्यावर कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएने (राष्ट्रीय तपास संस्था) मागील शनिवारी रात्री उशिरा मुंबई पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली होती. एनआयएने दिवसभर वाझे यांची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. कंबाला हिल येथील एनआयएच्या ऑफिसमध्ये सकाळी साडेअकराच्या सुमारास वाझे गेले होते. चौकशीनंतर रात्री ११.५० वाजता त्यांना अटक केली होती. त्यानंतर वाझे यांना २५ मार्चपर्यंत NIA कोठडी सुनावली आहे.