Sachin Vaze: सचिन वाझेंची पुन्हा प्रकृती बिघडली; मध्यरात्री डॉक्टरांकडून उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 08:43 AM2021-03-15T08:43:36+5:302021-03-15T08:45:39+5:30
Sachin Vaze Arrested by NIA: सचिन वाझे यांना शनिवारी 11.30 च्या सुमारास एनआयएन अटक केली होती. सुमारे 12 तास त्यांची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. तसेच स्कॉर्पिओमध्ये स्फोटके ठेवल्यानंतर चालकाने मुंबई पोलिसांच्याच क्राईम ब्रांचच्या इनोव्हा कारमधून पलायन केले होते.
मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर स्फोटके ठेवल्याप्रकरणी एनआयएच्या ताब्यात असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांची तब्येत पुन्हा बिघडली होती. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना बोलावण्यात आले होते. (doctor tratment on Sachin Vaze at Nia Office)
सचिन वाझे यांना शनिवारी 11.30 च्या सुमारास एनआयएन अटक केली होती. सुमारे 12 तास त्यांची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. तसेच स्कॉर्पिओमध्ये स्फोटके ठेवल्यानंतर चालकाने मुंबई पोलिसांच्याच क्राईम ब्रांचच्या इनोव्हा कारमधून पलायन केले होते. ही इनोव्हादेखील एनआयएने ताब्यात घेतली असून रविवारी याच्या जोरावर वाझे यांची 11 दिवसांची कोठडी मिळविली आहे.
रविवारी वाझे यांच्या हातावर न्यायालयात नेताना सलाईन लावल्याची पट्टी दिसत होती. रविवारी रात्रीदेखील एनआयएने डॉक्टर बोलावले होते. या डॉक्टरांनी वाझे यांची तपासणी करून रात्री १ च्या सुमारास एनआयए कार्यालयाबाहेर गेल्याचे सुत्रांनी सांगितले. NIA ने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. शनिवारी रात्रीदेखील वाझे यांना चौकशीमुळे थकवा जाणवत होता. यामुळे त्यांच्यावर जेजे हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. याबाबतचे वृत्त एका टीव्ही चॅनलने दिले आहे.
सचिन वाझे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असलेले दोन अधिकारी व दोघा वाहनचालकांची साडेनऊ तास चौकशी करण्यात आली. आणखीही काही अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. रियाझ काझी हे गेल्या ३ वर्षांपासून सीआययूमध्ये कार्यरत आहेत. सीआययू विभागात सचिन वाझे हे कार्यरत आहेत. जानेवारी महिन्यात टीआरपी घोटाळ्याप्रकरणी केलेल्या कामगिरीबद्दल बेस्ट डिटेक्शन म्हणून मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सहायक पोलीस आयुक्त शशिकांत सांडभोर, सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे, नितीन लोंढे, संतोष कोटवान आणि रियाझ काझी यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित केले होते.
सचिन वाझेंवरील दाखल कलमे -
कलम २८६ : जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणाने स्फोटके बाळगणे, इतरांच्या जिवाला धोका होईल असे वर्तन करणे
कलम ४६५ : खोट्या किंवा बनावट गोष्टी करणे
कलम ४७३ : दिशाभूल करण्यासाठी केल्या जाणाऱ्या बनावट कृती
कलम ५०६(२) : दहशत निर्माण करणे किंवा धमकी देणे
कलम १२० ब : गुन्हेगारी स्वरूपाच्या षड्यंत्रात सहभाग घेणे
स्फोटक पदार्थ कायदा १९०८ कलम ४ अ, ब – स्फोटके बाळगण्याचा
यात समावेश आहे.