कुटुंबियांना जीवे मारण्याची दिली धमकी, सचिन वाझेने अनिल देशमुखांवर केले आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 09:48 PM2022-02-10T21:48:59+5:302022-02-10T21:49:36+5:30
Sachin Vaze : अनिल देशमुख आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचे खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही वाजे यांनी केला आहे.
मुंबई - एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्यानुसार, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे काल चांदीवाल आयोगासमोर हजर झाला. त्याचवेळी देशमुख यांच्या सूचनेवरून वाझे याने बारमधून खंडणी वसूल केल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. तसेच एएनआयच्या वृत्तानुसार, बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी शपथपत्रात म्हटले आहे की, अनिल देशमुख यांनी त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. अनिल देशमुख आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचे खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही वाजे यांनी केला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दावा केला होता की, अनिल देशमुख यांनी वाजेला बार आणि हुक्का पार्लरमधून दरमहा १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते. त्याच वेळी, माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने न्या.चांदीवाल समितीची स्थापना केली होती.
In the affidavit, suspended Maharashtra Police officer Sachin Waze said that Anil Deshmukh threatened to kill his family members. He also alleged that Deshmukh got fake cases of extortion registered against him & former Mumbai Police Commissioner Param Bir Singh
— ANI (@ANI) February 9, 2022
तसेच मुंबईतील बार वसुलीप्रकरणी सचिन वाझेने माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात मोठी खेळी केली आहे. वाझेने थेट ईडीलाच प्रस्ताव दिला असून मनी लाँड्रिंग प्रकरणी माफीचा साक्षीदार बनविण्याची मागणी केली आहे.