साडूने केली साडूची हत्त्या; नाशिक जिल्ह्यातील घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 09:45 AM2023-08-16T09:45:00+5:302023-08-16T09:45:19+5:30

आरडाओरडा ऐकून आरोपीचा मुलगा सुरेश याने धाव घेत वडीलांना पकडून बांधून ठेवले.

Sadu killed Sadu; crime news the incident in Nashik district sugarana | साडूने केली साडूची हत्त्या; नाशिक जिल्ह्यातील घटनेने खळबळ

साडूने केली साडूची हत्त्या; नाशिक जिल्ह्यातील घटनेने खळबळ

googlenewsNext

- श्याम खैरनार
सुरगाणा (जि नाशिक) :  येथून जवळच असलेल्या सुर्यगड येथील माजी सरपंच मनोहर राऊत (४५) यांची हत्या त्यांच्याच साडूने केल्याची घटना आज पहाटे चार ते पाच वाजेच्या दरम्यान घडली आहे. तर मयत राऊत यांची पत्नी आणि आरोपीची पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत.

 मिळालेल्या माहितीनुसार आरोपी भास्कर पवार आणि मयत माजी सरपंच मनोहर सुरेश राऊत हे सख्खे साडू होते. भास्कर पवार हा तालुक्यातील पळसन जवळील पायरपाडा येथील असून तो पत्नी मंदा पवार व मुलगा सुरेश यांचेसह मागील पाच सहा महिन्यांपासून सुर्यगड शिवारातील मळ्यात रहात असलेल्या राऊत यांचेकडे रहात होते. आज पहाटे घरात सर्व जण गाढ झोपेत असताना आरोपी भास्कर पवार याने मोठ्या धारदार कुऱ्हाडाने सख्खा साडू असलेल्या माजी सरपंच मनोहर राऊत यांचे मानेवर घाव घालून जागीच हत्या केली. यानंतर राऊत यांची पत्नी भारती यांचेवर घाव घातला. मात्र हा घाव हाताच्या दंडावर बसून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

यावेळी आरोपी भास्कर याने त्याची पत्नी मंदा पवार हिला देखील जखमी केले. यावेळी आरडाओरडा ऐकून आरोपीचा मुलगा सुरेश याने धाव घेत वडीलांना पकडून बांधून ठेवले. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले. जखमी महिलांवर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी मयत मनोहर राऊत यांची पत्नी भारती राऊत यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. यावेळी रूग्णालयात मोठी गर्दी झाली होती. राऊत यांचे पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील असा परिवार आहे. आरोपी भास्कर पवार यास त्याच्या मुळ गावातून काढून दिले असल्याची चर्चा सुरू होती.

Web Title: Sadu killed Sadu; crime news the incident in Nashik district sugarana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.