Sagar Dhankar Murder : जेलमध्ये मन लागत नाही! म्हणून सुशील कुमारने केली टीव्हीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 02:21 PM2021-07-05T14:21:50+5:302021-07-05T14:23:47+5:30
Sagar Dhankar Murder : जेलमध्ये मन लागत नाही, तसेच कुस्तीविश्वात घडणाऱ्या घडामोडी कळण्यासाठी टीव्ही हवा असल्याचे सुशील कुमारने आपल्या अर्जात नमूद केले आहे. त्याने आपल्या वकिलाकरवी हा अर्ज तुरुंग प्रशासनाला दिला आहे.
युवा कुस्तीपटू सागर धनकर याच्या हत्येप्रकरणी सध्या तिहार जेलमध्ये असलेला भारतीय ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटूसुशील कुमार याने आता नवीन मागणी केली आहे. सुशील कुमारला तिहार जेलमधल्या त्याच्या बरॅकमध्ये टीव्ही पाहिजेय. तुरुंग अधिकाऱ्यांनीच यासंदर्भातली माहिती दिली आहे. अलीकडेच, दिल्ली न्यायालयाने सुशील कुमारची विशेष जेवण आणि कुस्तीपटूचा डाएटयुक्त आहार मिळण्याची मागणी फेटाळून लावल्यानंतर आता त्याने टीव्हीची मागणी केली आहे. जेलमध्ये मन लागत नाही, तसेच कुस्तीविश्वात घडणाऱ्या घडामोडी कळण्यासाठी टीव्ही हवा असल्याचे सुशील कुमारने आपल्या अर्जात नमूद केले आहे. त्याने आपल्या वकिलाकरवी हा अर्ज तुरुंग प्रशासनाला दिला आहे.
तिहार जेलचे डीजी संदीप गोयल म्हणतात की, कारागृह प्रशासनाला सुशील या पहलवानाकडून अर्ज आला असून त्यात त्याने जेलमध्ये टीव्ही लावण्याची मागणी केली आहे. कारागृह प्रशासनाचे म्हणणे आहे की, सुशील कुमार तुरूंगातील दोन नंबरच्या बरॅकमध्ये आहे आणि सुरक्षेसाठी त्याला अतिसुरक्षित तुरूंगात ठेवण्यात आले आहे. सुशीलला ज्या कक्षात ठेवले आहे तेथे इतर कोणत्याही कैद्याला ठेवण्यात आले नाही. सुशील कुमार याच्या अर्जावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
जेल प्रशासनाकडून पैलवान सुशील कुमारची ही पहिली मागणी नाही. यापूर्वी सुशील कुमार यांना अटकेनंतर मंडोली तुरुंगात पाठविण्यात आले होते, तेथे सुशील कुमारनेही आपल्या कुस्तीचा उल्लेख करत हायप्रोटीन आहाराची सोय करावी अशी मागणी तुरूंग प्रशासनाने केली होती. यामध्ये प्रोटीन देणाऱ्या हेल्थ सप्लिमेंट्स, ओमेगा-३ कॅप्सुल्स, जॉइंटमेंट कॅप्सुल्स, प्रि-वर्कआऊट सी-४, मल्टिव्हिटॅमिन जीएनसी आणि एक्सरसाईज बँड यांचा समावेश होता. मात्र, कोर्टाने त्याची ही मागणी फेटाळून लावल्यानंतर आता त्याने नवीन मागणी केली आहे.
In a letter to jail authorities, wrestler Sushil Kumar has asked for a TV. He expressed that if he gets TV, he will get updates on wrestling: Tihar Jail officials
— ANI (@ANI) July 4, 2021
He is in Delhi's Tihar Jail in connection with the killing of 23-year-old Sagar Rana at Chhatrasal Stadium.