सुशांत सिंह राजपूतच्या भावावर गोळीबार करणाऱ्यांना अटक, मिळाली होती 5 लाखांची सुपारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 09:34 AM2021-02-15T09:34:23+5:302021-02-15T09:44:13+5:30
Crime News : भररस्त्यात काही अज्ञातांनी सुशांतच्या भावासह आणखी एका व्यक्तीवर गोळ्या झाडल्या होत्या.
नवी दिल्ली - छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंत यशस्वी प्रवास करणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला. यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली होती. काही दिवसांपूर्वी सुशांत सिंह राजपूतच्या भावावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची भयंकर घटना समोर आली होती. भररस्त्यात काही अज्ञातांनी सुशांतच्या भावासह आणखी एका व्यक्तीवर गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर आता पोलिसांनी सुशांतच्या भावाला गोळ्या घालणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. सुशांत सिंह राजपूतचा मावस भाऊ राजकुमार सिंह आणि त्याच्या एका सहकाऱ्यांवर अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडल्या होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार सिंह आणि त्यांचे साथीदार असलेल्या अमीर हसन यांना 30 जानेवारी रोजी गोळ्या घालण्यात आल्या होत्या. या हल्ल्यात हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. सुशांत सिह राजपूतचा मावस भाऊ राजकुमार सिंह यांचं मधेपुरा येथे मोटारसायकल शोरूम आहे. मधेपूरा येथे शोरूम उघडण्यासाठी जात असताना त्यांच्यावर गोळीबार झाला. या हल्ल्यात राजकुमार सहीत त्यांचा सहकारी गंभीर जखमी झाला होता. यामध्ये सहकारी अमीर हसनची प्रकृती अधिक चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मिळाली होती 5 लाखांची सुपारी
सहारसाचे एसपी लिपी सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, जमिनीवरून झालेल्या वादावरून ही घटना घडली. यामाहा शोरूमचे मालक राजकुमार सिंहचा छोटा भाऊ आणि शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक उमेश दालान यांच्यात पूर्वीपासूनच जमिनीवरून वाद सुरू आहेत. याच कारणावरून उमेश दालानने विकी चौबे नावाच्या एका व्यक्तीला भावाला मारण्याची 5 लाखांची सुपारी दिली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तपासासाठी एसआयटी टीम गठीत केली. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज पाहिलं असता आरोपींबद्दलची माहिती मिळाली. फोन लोकेशनवरून आरोपींच्या पत्ता लागला.
धक्कादायक! दिवसाढवळ्या झालेल्या या घटनेने लोकांमध्ये भीतीचे वातावरणhttps://t.co/XRyc3vwghk#crime#crimesnews
— Lokmat (@MiLOKMAT) February 11, 2021
बिंदेश्वरी यादव नावाच्या गुन्हेगारासह 5 जणांना अटक
पोलिसांनी याठिकाणी छापा टाकत बिंदेश्वरी यादव नावाच्या गुन्हेगारासह 5 जणांना अटक केली. या आरोपींना याआधीही अनेक गुन्हे केले आहेत. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. राजकुमार सिंह मधेपूरा येथे शोरूम उघडण्यासाठी जात होते. यावेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गाडीला ओव्हर टेक करत गोळीबार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राजकुमार सिंह आणि त्याच्या सहकाऱ्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यासह दोघांवर या प्रकरणात कर्तव्यात कसूर आणि हलगर्जीपणा केल्याचा आरोप, घटनेने खळबळhttps://t.co/dUQL9n8umk#Rape#crime#crimesnews
— Lokmat (@MiLOKMAT) February 9, 2021