सौरभची हत्या करणाऱ्या साहिल-मुस्कानची दुसरी मागणीही जेलमध्ये झाली पूर्ण, काय होती इच्छा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 10:39 IST2025-03-28T10:38:39+5:302025-03-28T10:39:49+5:30

सौरभ हत्याकांडात जेलमध्ये असलेल्या साहिल आणि मुस्कानची दुसरी मागणीही पूर्ण झाली आहे.

sahil muskan second demand fulfilled in meerut jail government lawyer rekha jain appoint saurabh case | सौरभची हत्या करणाऱ्या साहिल-मुस्कानची दुसरी मागणीही जेलमध्ये झाली पूर्ण, काय होती इच्छा?

फोटो - आजतक

मेरठच्या सौरभ हत्याकांडात जेलमध्ये असलेल्या साहिल आणि मुस्कानची दुसरी मागणीही पूर्ण झाली आहे. दोघांनाही सरकारी वकील हवा होता. साहिल आणि मुस्कान यांनी त्यांना सरकारी वकील उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. यावर न्यायालयाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर रेखा जैन यांची यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. 

मेरठ जिल्हा कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे सचिव उदयवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयीन प्रक्रियेअंतर्गत आरोपीला वकील उपलब्ध करून देणं बंधनकारक आहे. अशा परिस्थितीत, रेखा जैन आता मुस्कान आणि साहिल यांच्या वतीने न्यायालयात त्यांच्या बचावासाठी युक्तिवाद सादर करतील.

जेलमध्ये पूर्ण झाली साहिलची 'ही' खास मागणी; अधिकाऱ्यांनी सांगितलं का पूर्ण केली आरोपीची इच्छा?

साहिलने याआधी अधिकाऱ्यांकडे केस कापण्याची मागणी केली होती. अधिकाऱ्यांची सांगितलं की, जेलमध्ये सर्वांना शिस्त पाळावी लागते, कोणत्याही कैद्याची जी काही मागणी असेल ती नियमांनुसार पूर्ण केली जाते. मेरठ जेलचे वरिष्ठ अधीक्षक डॉ. वीरेश राज शर्मा म्हणाले की, साहिलने आपले केस कापण्याची इच्छा व्यक्त केली होती. जेल प्रशासनाने ही विनंती मान्य केली आहे. 

जेलमध्ये प्रत्येक कैद्याला काम करायला लावलं जातं, परंतु सध्या साहिल आणि मुस्कानला कोणतंही काम करायला लावलं जात नाही. अधिकाऱ्यांच्या मते, त्यांना सध्या कोणतंही काम देण्यात आलेलं नाही, १० दिवस पूर्ण झाल्यानंतरच ते जेलमधील कोणत्याही कामात सहभागी होतील. सौरभ हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. 

Web Title: sahil muskan second demand fulfilled in meerut jail government lawyer rekha jain appoint saurabh case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.