साहिललाही तशीच शिक्षा मिळावी, मुलीच्या हत्येनंतर पीडित वडिलांंचा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 05:08 PM2023-05-29T17:08:40+5:302023-05-29T17:13:31+5:30

अल्पवयीन मुलाच्या हत्येचा अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

Sahil should get the same punishment, cry victim's father after daughter's murder | साहिललाही तशीच शिक्षा मिळावी, मुलीच्या हत्येनंतर पीडित वडिलांंचा आक्रोश

साहिललाही तशीच शिक्षा मिळावी, मुलीच्या हत्येनंतर पीडित वडिलांंचा आक्रोश

googlenewsNext

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत एका अल्पवयीन मुलीवर चाकून सपासप वार करत हत्या केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आलाय. या घटनेनंतर तीव्र भावना व्यक्त होत असून खासदार गौतम गंभीरनेही घटनेवर राग व्यक्त केलाय. याप्रकरणी, पोलिसांनी बुलंदशहर येथून आरोपीला अटक केली आहे. आता, पीडित मुलीच्या आई-वडिलांनी आरोपी साहिलला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केलीय. तर, आरोपीलाही तशाच प्रकारे शिक्षा करावी, ज्या पद्धतीने त्याने माझ्या मुलीला ठार मारले, अशी मागणी पीडित मुलीच्या वडिलांनी केलीय.

अल्पवयीन मुलाच्या हत्येचा अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. शाहबाद डेअरी परिसरात साहिल नावाच्या युवकाने १६ वर्षीय मुलीची चाकूने वार करत आणि दगडाने ठेचून हत्या केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले की, वाद सुरू असताना त्याने तरुणीला रस्त्यात थांबवले आणि तिच्यावर चाकूने हल्ला केला. मुलीवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ इतका भयानक आहे की, तो माध्यमांमध्ये दाखवताही येत नाही. दरम्यान, मुलीचा मारेकरी साहिल याला बुलंदशहर येथून अटक करण्यात आली आहे. या घटनेवरुन आता सोशल मीडियात संताप व्यक्त होत आहे. मुलीच्या वडिलांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना, आरोपी साहिललाही तशीच शिक्षा मिळायला हवी, अशी मागणी केलीय. 


आरोपीने ज्या पद्धतीने माझ्या मुलीला मारले, त्याच प्रकारची शिक्षा आरोपीला मिळावी. म्हणजे, यापुढे कोणीही असे कृत्यू करणार नाही, असे पीडित वडिलांनी म्हटले. तसेच, माझी मुलगी खूप चांगली होती. मला साहिल आणि मुलीबद्दल काहीही माहिती नव्हते, पोलिसांच्या तपासातच काही माहिती कळाली, असेही मुलीच्या वडिलांनी म्हटले. दरम्यान, मुलगी गेल्या १० दिवसांपासून तिच्या मैत्रिणीच्या घरी राहात होती, असे मुलीच्या आईने सांगितले. 

अल्पवयीन मुलगी रस्त्यावरून जात असताना अचानक एका मुलाने तिला अडवून तिच्यावर चाकूने हल्ला केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याने मुलीला दगडाने ठेचून ठार केले. विशेष म्हणजे ही घटना घडत असताना, बाजुला काही व्यक्ती उभ्या असलेल्या, तेथून जात असलेल्या दिसून येतात. मात्र, कुणीही त्या आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. यावरुन, गौतम गंभीरने ट्विट करुन संताप व्यक्त केला आहे. जर तुमच्या बहिण किंवा मुलीवर असा वैश्यी हल्ला झाला असता तरी हे लोकं असेच चालत, बघत पुढे गेले असते का, जनावर फक्त तोच नाही, तर सगळेच आहेत, असे म्हणत गंभीरने दिल्लीतील घटनेवर संताप व्यक्त केला आहे. 

हल्ल्याचे कारण काय?

पोलीस तपासात आरोपीचे नाव साहिल असून वडीलांचे नाव सर्फराज असल्याचे समोर आले. अल्पवयीन मुलगीही दिल्लीची रहिवासी होती. साहिल आणि ती मुलगी रिलेशनशिपमध्ये असल्याचे पोलिसांनी, मिळालेल्या माहितीनुसार सांगितले. प्रेम संबंधातील मतभेदामुळे रविवारी त्यांच्यात वाद झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यानंतर अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीच्या मुलाच्या वाढदिवसाला जात असताना साहिलने तिला रस्त्यातच अडवले. दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर जीवे मारण्याच्या उद्देशाने साहिलने मुलीवर चाकूने हल्ला केला.
 

 

Web Title: Sahil should get the same punishment, cry victim's father after daughter's murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.