फ्लॅट विक्रीच्या व्यवहारप्रकरणी चार कोटींचा चुना; आरोपी गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 08:16 PM2019-11-11T20:16:38+5:302019-11-11T20:39:12+5:30

पोलिसांनी अन्य आरोपीची शोध मोहीम सुरु केली आहे.

In sale of 4 crore flat duped money; The accused arrested | फ्लॅट विक्रीच्या व्यवहारप्रकरणी चार कोटींचा चुना; आरोपी गजाआड

फ्लॅट विक्रीच्या व्यवहारप्रकरणी चार कोटींचा चुना; आरोपी गजाआड

Next
ठळक मुद्देखाजगी बँकेला गंडा घालणाऱ्या प्रकाश हिराराम मारूला (३२) अटक करण्यात आलेली आहे. वांद्रे पोलिसांनी भा.दं.वि. कलम ४०६,४२०,४६५,४६८,४७१ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.

मुंबई - बनावट दस्तावेजाच्या आधारावर घर खरेदी-विक्रीचा व्यवहारप्रकरणी खाजगी बँकेला गंडा घालणाऱ्या प्रकाश हिराराम मारूला (३२) अटक करण्यात आलेली आहे. पोलिसांनी अन्य आरोपीची शोध मोहीम सुरु केली आहे. प्रकाश हा मीरारोड पूर्व येथे राहणार आहे. 

अटक आरोपी प्रकाश मारू याच्या बँक खात्यात २० लाख रुपये तर अन्य आरोपींपैकी हार्दिक नितीन गोठी याच्या बँकेच्या खात्यात ४० लाख रुपये वळविण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या फसवणूक प्रकरणात तक्रारदार हे वांद्रे परिसरात राहणारे असून त्यांच्या मालकी हक्काची असलेला आलिशान फ्लॅट त्यांनी विक्रीसाठी काढला होता. त्याकामासाठी तक्रारदार यांचा मित्र अरिफ सय्यद याला त्यांनी सांगितले. आरिफ आणि इस्टेट एजंट यांना तक्रारदार यांनी माहिती दिली.  साधारण जून २०१७ मध्ये आरिफ सय्यद याच्या ओळखीचा इसम असलेल्या अब्दुल्ला खान उर्फ पप्पू याने तक्रारदार यांना संपर्क साधला आणि सांगितले की, त्याचा मित्र नरेंद्र अगरवाल याला हा फ्लॅट घेण्यात रस आहे. तसेच पप्पू तक्रारदाराकडे त्यासारख्या राहत्या घरी अगरवालला घेऊन गेला. त्यावेळी हा फ्लॅट ५ कोटी ४२ लाख रुपयांना विकण्याचे ठरले. त्यावेळी फ्लॅट खरेदीस इच्छुक असलेल्या नरेंद्र अगरवाल याने रक्कम जास्त असल्याने बँकेचे कर्ज घ्यावे लागेल असे सांगितले.

त्यावेळी नरेंद्र यांचा मित्र राकेश चक्रवर्ती याने बँकेतून कर्ज काढून देण्याची तयारी दाखविली. फ्लॅटच्या खरेदी आणि विक्रीचा व्यवहार करून करारनामा करू असे सांगून टोकण म्हणून १० लाखाची रक्कम तक्रारदार यांना द्यावी असा व्यवहार ठरला. उर्वरित रक्कम ५ कोटी ३२ लाख रुपये कर्ज काढून देण्याचा निश्चित केले. आणि कर्जाची प्रक्रिया सुरु झाली. २० जूनला राकेशने १० लाखाची रक्कम बँकखात्यावर ट्रान्स्फर केली. त्यानंतर घरविक्रीचं अनोंदणीकृत करारनामा करण्यात आला. राकेशने बँकेने ४ कोटी ११ लाख रुपये कर्ज मंजूर केल्याचे सांगितले. काही रक्कम कमी असल्याने व्यवहार रद्द करा असा सूर तक्रारदाराने काढला. त्यावेळी उर्वरित रक्कम दिल्यानंतर ही रक्कम मिळताच कॅन्सलेशन डिड करण्याचे सांगितले. तक्रारदाराने विश्वास ठेवून नऊ ब्लॅक चेक घेतले आणि राकेश चक्रवती याला दिले. यावेळी दलाली म्हणून पप्पूला ८ लाख ८० हजाराचे तीन धनादेश दिले. बँकेत ४ कोटी पाच लाख रुपये जमा झाले होते. ही रक्कम जमा होताच राकेशने मारबलेक्स सिटी इन्फ्राचे अब्दुल्ला खान उर्फ पप्पू, विदेही डायकेम, प्रकाश हिराराम, वैदेही सहकारी पेठ, राकेश चक्रवर्ती यांचे श्री साई सी फूड्स, हार्दिक नितीन गोठी, नरेंद्र अगरवाल, खाते क्रमांक ००२००००२४९४३५ आणि चामुंडा इंटरप्राईझेस या नऊ बँक खात्यात चार कोटी पाच लाख रुपये वळविण्यात आले आणि तक्रारदार असलेल्या घरमालकाला गंडा घालण्यात आला. तक्रारदाराने या व्यवहारानंतर राकेशला फोन करून फ्लॅटचे कागदपत्र मागितले. तेव्हा सर्व कागदपत्र पैसे परत केल्यानंतर घेऊन येतो असे सांगितले.

राकेशने वकिलामार्फत पत्रव्यवहार करून सोसायटीला तक्रारदाराचा फ्लॅट त्याने खरेदी केल्याचे सांगून त्याचे मेंटेनन्स आणि इतर शेअर सर्टिफिकेट हे नावावर करण्याची विनंती केली. याबाबत माहिती मिळताच तक्रारदार असलेल्या घरमालकाला धक्काच बसला. सोसायटीला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पीएनबी हाऊसिंग फायनान्स कंपनीचे लोक घरी आले. फ्लॅटचे कागदपत्र त्यांच्या नावावर असल्याने कर्ज न भरल्यास फ्लॅटवर कारवाईचे संकेत दिले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने वांद्रे पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर वांद्रे पोलिसांनी भा.दं.वि. कलम ४०६,४२०,४६५,४६८,४७१ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. याच गुन्ह्यात पोलिसांनी प्रकाश मारू याला अटक केली आहे. अन्य आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. 

 

Web Title: In sale of 4 crore flat duped money; The accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.